सु.को.धा. रस्त्यासाठी ३ कोटी ९८ लाख मंजूर –आ. आशुतोष काळे
सु.को.धा. 3 crore 98 lakh sanctioned for roads. MLA Ashutosh Kale
कोपरगाव: तालुक्यातील महत्वाच्या सुरेगाव- कोळपेवाडी-धारणगाव या रस्त्यासाठी ३ कोटी ९८ लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव तालुक्याच्या रस्त्यांचा अनुशेष भरून काढतांना पुर्व पश्चिम भागाला जोडणारा सुरेगाव- कोळपेवाडी – माहेगाव देशमुख -कुंभारी-धारणगाव या (प्रजीमा ८५) एकून साडे आठ किलोमीटरचा हा वर्दळीचा रस्ता सुरेगाव, कोळपेवाडी, कोळगाव थडी, कुंभारी,धारणगाव तसेच शहाजापूर, वेळापूर, या गावातील नागरिकांना कोपरगाव जाणेसाठी जवळचा व सोयीस्कर आहे . यासाठी निधी मंजूर करण्यात आ. आशुतोष काळे यांना यश मिळाले असून या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी ३ कोटी ९८ लाख रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली आहे.
रस्ते ह्या विकासाच्या धमन्या म्हटल्या जातात त्यामुळे मतदार संघाच्या विकासासाठी नागरिकांना चांगले रस्ते उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी आ. आशुतोष काळे शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून कोरोनाच्या संकटात देखील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करीत आहे.





