प्रभाग क्र. २ चा विद्युत पुरवठा सुरळीत करा –जनार्दन कदम
Ward no. Strengthen the power supply of 2 – Janardhan Kadam,
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Thu 8July 16:40
कोपरगाव: प्रभाग क्र. २ येथील निवारा, सुभद्रानगर, जानकी नगर रिद्धीसिद्धी नगर या भागात वारंवार लाईट जाण्याचे प्रमाण वाढल्याने परिसरातील अनेक नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक व्यापारी आदींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तेंव्हा तातडीने प्रभाग क्र. २ चा विद्युत पुरवठा सुरळीत करा अशी मागणी परिसरातील नागरिकांच्या वतीने नगरसेवक जनार्दन कदम यांनी वीज वितरण कंपनी अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत वीज वितरण कंपनी कोपरगावला यापूर्वी १२ एप्रिल २०२१ व ६ जुलै २०२१ रोजी मान.उपकार्यकारी अभियंता कोपरगाव यांना स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत उपनगरातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे निवेदन उपकार्यकारी अभियंता श्री.खराटे यांना देण्यात आल्याचे
सर्व स्थानिक नागरिकांच्या वतीने नविन विद्युत रोहित्र बसवुन मिळावी किंवा विद्युत लोड विभागणी व्यवस्थितरीत्या करून मिळवीत यासाठी उपस्थित नागरिकांच्या वतीने देखील जोरदार मागणी करण्यात आली. निवेदन स्वीकारून श्री.खराटे यांनी सांगितले कि, नागरिकांच्या मागणीचा विचार करून १५ दिवसात अंमलबजावणी करण्याची सर्व नागरिकांना ग्वाही दिली.
प्रसंगी प्रभाग क्रमांक २ मधील नगरसेवक श्री.जनार्दन कदम तसेच सतीश जाधव, माजी सैनिक आनंद डिके, श्रीपाद कुलकर्णी, वैभव गिरमे, अमोल राजूरकर, दशरथ सरवान, संतोष बैरागी, विष्णुपंत गायकवाड, आदिंसह परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.





