माजीमंत्री शंकरराव कोल्हेनीं दिले साखर आयुक्तांना कारखानदारीचे धडे
Former Minister Shankarrao Kolheni gave lessons of industry to the Sugar Commissioner
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Thu 8July 18:00
कोपरगाव :खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरणाची प्रक्रिया जारी २७ वर्षांपूर्वी सुरू झालेली असली तरी, भविष्यात काय समस्या जाणवेल आणि त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे याची तयारी सहकारातील नेतृत्वाने अगोदरच करावी. सहकारी साखर कारखानदारी ही ऊसशेती व शेतकऱ्यांचा जीव की प्राण आहे, तेव्हा खुल्या अर्थव्यवस्थेत सहकार टिकला पाहिजे त्यासाठी आपल्या समर्थ ज्ञानाची राज्यातील शेतकऱ्यांना गरज असून त्यांनुरूप राज्यातील अन्य कारखान्यांना शिकवण द्यावी अशा शब्दात माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना कारखानदारीचे धडे दिले.
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने पॅरासिटामॉल औषध निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले असून त्याच्या अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळेच्या उद्घाटनाच्यानिमित्त साखर आयुक्त गायकवाड बुधवारी संजीवनी कारखाना कार्यस्थळी आले असता त्या प्रसंगी शंकरराव कोल्हे यांच्याशी यांनी वार्तालाप साधला. याप्रसंगी अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, तज्ञ संचालक विवेक कोल्हे, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
साखर उद्योगातील पितामह म्हणून माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांची ओळख असून त्यांच्या ज्ञानाचा आपल्याला कसा फायदा होईल म्हणून साखर आयुक्त शंकर गायकवाड यांनी त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. वयाची नव्वदी उलटली. असाध्य अर्धांगवायू आजारावर आत्मबलाने विजय मिळवत, माजीमंत्री शंकरराव कोल्हे आजही नियमितपणे कारखान्यावर येतात. नातू विवेक कोल्हे, अधिकारी, व्यवस्थापन, खातेप्रमुख, उपखाते प्रमुख आदींना मार्गदर्शन देतात. त्यांची स्मरणशक्ती दांडगी आहे.
माजीमंत्री शंकरराव कोल्हे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी वार्तालाप करताना म्हणाले की, ग्रामीण अर्थकारणाची जननी सहकार आहे. त्याचे नेतृत्वIने असंख्य असामान्य कामे सक्षमपणे उभी राहिली आहेत. सहकार चळवळ उभारली, शेतकरी वर्गासह सर्वसामान्यांच्या छोट्या-मोठ्या दैनंदिन गरजा सुटल्या. चालू गळीत हंगामात अतिरिक्त साखर उत्पादन होणार असून त्याच्या गाळपाची काय व्यवस्था आहे. या वर्षी साखर मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे. त्यातच गेल्या वर्षीचा साखरेचा साठा गोदामात पडून आहे. त्यावर व्याजाचा भुर्दंड कारखान्यांना सोसावा लागत आहे. साखरेचा उत्पादन खर्च आणि त्याप्रमाणात मिळत असलेला दर याचा ताळमेळ एक रक्कमी एफ आर पी देताना बसत नाही. कारखान्यांना त्यासाठीची आर्थिक तरतूद करताना तारेवरची कसरत करावी लागते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः केंद्रीय पातळीवर सहकार मंत्रालय विभागाची स्वतंत्र निर्मिती केली, हे योग्य पाऊल असून साखर उद्योगाच्या भवितव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढवुन त्याचे दर वाढवले म्हणून सहकारातील काही कारखाने आज तग धरून आहेत, मात्र हे प्रमाण आणखीन वाढवले तर त्यातून साखर कारखान्यांचे आर्थिक प्रश्न सुटू शकतील. राज्यशासनाने या उद्योगाच्या जपणुकीसाठी केंद्राप्रमाणेच नियोजन करण्यासाठी धाडसी निर्णय घ्यावेत, आधुनिकीकरणाची कास धरत ज्या कारखान्यांनी दैनंदिन गाळप क्षमता वाढवली तेच कारखाने आज टिकून आहेत. साखर आयुक्त म्हणून आपणही राज्यातील अन्य कारखान्यांना उप फक्त तु पदार्थांबरोबरच अन्य व्यवसाय निर्मितीचे धडे द्यावेत व ग्रामीण अर्थकारणiचे जाळे अधिक घट्ट बनवावे. साखरेचा समस्या आणि त्यावरील उपाय योजनाही यावेळी कोल्हे यांनी सांगितल्या. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कोल्हे यांची प्रत्येक गोष्ट जाणीवपूर्वक अभ्यासत त्यातून काय करता येईल याचे धडे घेतले.





