संजीवनी पाॅलीटेक्निकच्या १० विद्यार्थ्यांची रेनाटा मध्येे निवड – अमित कोल्हे
Selection of 10 students of Sanjeevani Polytechnic in Renata – Amit Kolhe
संजीवनीच्या प्रयत्नाने १९ व्या वर्षी विद्यार्थी स्वावलंबी 19th year student self-reliant due to resuscitation efforts
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Fir 9July 10:00
कोपरगांव: संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने वाहन उद्योगासाठी लागणाऱ्या मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्राॅनिक सुट्या भागांची निर्मिती करणाऱ्या आघाडीच्या रेनाटा प्रिसीझन काम्पोनंटस् प्रा. लि.या कंपनीने दूरदृष्य प्रणालीद्वारे मुलाखती घेवुन संजीवनीच्या अंतिम वर्षातील १० विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केली. संजीवनीचे विद्यार्थी वयाच्या १९ व्या वर्षी स्वावलंबी बनत आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की कोविड १९ च्या काळात अनेकांच्या नोकऱ्या जावुन हजारो कुटूंबे अडचणीत सापडली. अुनभवी अभियंतेच अडचणीत आले तर नवोदित अभियंत्याना कोण नोकरी देणार, अशी परीस्थिती निर्माण झाली. मात्र अशाही परीस्थितीत उद्योग जगताला आवश्यक असणारे तंत्रस्नेही अभियंते तयार करण्यात संजीवनीने आघाडी घेतली असल्यामुळे एका पाठोपाठ एक कंपनी संजीवनीच्या विद्यार्थ्यांची नोकऱ्यांसाठी निवड करीत आहे. रेनाटामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये साक्षी अभिजीत भोंगळे, अक्षदा भरत आरणे, रेणुका शंकर कहार, राजलक्ष्मी दत्ता मोरे, साहिल संजय झुरळे, जनार्धन दौलत गडाख, तेजस दत्तात्रय उदे, विशाल राजेंद्र शिंदे , प्रसाद सुनिल पगारे व रामकिसन प्रविण पेहरकर यांचा समावेश आहे. संजीवनीच्या प्रयत्नाने ग्रामिण भागातील शेकडो विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड होत असल्याने माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष श शंकरराव कोल्हे यांची ४० वर्षांपूर्वीची दूरदृष्टीता सत्यात उतरत आहे. सध्या महाराष्ट्र शासनाने पाॅलीटेक्निकच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू केली असल्याने अनेक पालक आपले पाल्य वयाच्या १९ व्या वर्षीच कमावते व्हावे, या महत्वाकांक्षेने संजीवनमध्येच आपल्या पाल्यास प्रवेश मिळावा, यासाठी संजीवनीच्या मार्गदर्शन केंद्रातुन मार्गदर्शन घेत आहे. ग्रामिण भागातील विध्यार्थ्यांच्या निवडीबध्दल शंकरराव कोल्हे, संस्थेचे कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी गुणवंत विद्यार्थी व त्यांचे भाग्यवान पालक यांचेसह प्राचार्य ए. आर. मिरीकर व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. आय. के. सय्यद यांचे अभिनंदन केले.