संपूर्ण मतदार संघाला न्याय देणार – आ. आशुतोष काळे
Will give justice to the entire constituency – MLA. Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Wed 14July 8:30
कोपरगाव : माजी आमदार अशोकराव काळे यांनी गोदावरी नदीवर विविध ठिकाणी पूल बांधून कोपरगाव तालुका एकमेकाला जोडला हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मतदार संघातील शेवटचे टोक असलेल्या धनगरवाडीपर्यंत विकासाची गंगा घेऊन संपूर्ण मतदार संघाला न्याय देणार असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी शिंगवे नाल्याजवळ ५६.६० लाखाच्या पुलाच्या कामाचे भूमिपूजन याप्रसंगी केले .
आ. आशुतोष काळे म्हणाले की, संपूर्ण मतदार संघाचा विकास करणे माझी जबाबदारी आहे. कोपरगाव तालुक्याप्रमाणेच राहाता तालुक्यातील अकरा गावांचा देखील विकास होणार आहे. मागील काही वर्षापासून पावसाळ्यात गोदावरी नदीला पाणी आल्यानंतर वारी-शिंगवे रस्त्यावर कायमस्वरूपी पुल व्हावा अशी दोनही गावातील नागरिकांची मागणी होती. नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून या पुलासाठी ५७.६० लाख रुपये निधी दिला आहे. हा पूल लवकरच पूर्ण होणार असून वारी-शिंगवे हि गावे एकमेकांना जोडली जाणार आहे.
याप्रसंगी मधुकर टेके, बाबासाहेब कोते, मुरलीधर थोरात, अण्णासाहेब कोते, राजेंद्र धनवटे, दादासाहेब उगले, ज्ञानदेव चौधरी, अशोक चौधरी, भाऊसाहेब जाधव, नानासाहेब काळवाघे, सुभाष चौधरी, मच्छिंद्र चौधरी, विकास चौधरी, बाबासाहेब चवडे, सीताराम पगारे, बाळासाहेब बाभुळके, पद्माकर सुराळकर, पोपटराव चौधरी, जनार्दन बरगे, गोपीनाथ सुराळकर, प्रकाश जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.





