शिवसंपर्क अभियानांतर्गत ना. गडाखांचा शिवसैनिकांशी संवाद

शिवसंपर्क अभियानांतर्गत ना. गडाखांचा शिवसैनिकांशी संवाद

Under Shiv Sampark Abhiyan no. Gadakh’s interaction with Shiv Sainiks

शिवसेनेचे काम तळागाळात पोहचविणार -नितीन औताडे Shiv Sena’s work will reach the grassroots – Nitin Autade

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Wed 14July 8:20

कोपरगाव : काल कोपरगाव येथे शिवसंपर्क अभियानाची सुरुवात ना. शंकरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आली. पोहेगाव नागरी पतसंस्थेच्या कार्यालयात कोपरगाव तालुक्यातील विविध भागातील शिवसैनिकांशी संवाद साधत त्यांनी शिवसंपर्क अभियान अंतर्गत राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने केलेले काम सांगण्याची संधी या माध्यमातून शिवसैनिकाना मिळाली आहे.शिवसैनिकांनी हे अभियान प्रभावीपणे राबवावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी खा. सदाशिव लोखंडे, नितीन औताडे,  भगिरथ होन, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब रहाणे, सरपंच अमोल औताडे, संजय गुरसळ, दादासाहेब औताडे, अभिषेक आव्हाड, रवींद्र औताडे, शिवाजी जाधव, गोपाळराव सोनवणे, सुरेश शिलेदार, रवि भालेराव , बाळासाहेब गुरसळ, दिगंबर पवार, अशोक म्हाळसकर, शरद गवळी, दीपक खंडीझोड, संजय उगले ,अदी उपस्थित होते.

यावेळी  नितीन औताडे यांनी उपस्थित शिवसैनिकां मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने केलेले काम कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम केले जाईल.शिवसेना पक्ष वाढीसाठी ही प्रयत्न केले जाईल असे आश्वासन ना. शंकरराव गडाख व खा. सदाशिव लोखंडे यांना दिले.
खा. सदाशिव लोखंडे यांनी मार्गदर्शन करत कोपरगाव तालुक्यात शिवसेना पक्ष वाढीसाठी काम करा असे सांगितले. सूत्रसंचालन पंचायत समिती सदस्य बाळासाहेब रहाणे यांनी केले, तर आभार अमोल औताडे यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page