३ दुचाकी आणि ३ आरोपी, कोपरगाव शहर पोलिसांची धडक कारवाई,

३ दुचाकी आणि ३ आरोपी, कोपरगाव शहर पोलिसांची धडक कारवाई,

3 two wheelers and 3 accused, Kopargaon city police crackdown,

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Thu 15July 17:30

 कोपरगाव : कोपरगाव शहर पोलिसांनी धडक कारवाई करत मोटारसायकल चोरणाऱ्या ३ चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पकडलेल्या आरोपींकडून ३ दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

रविवारी (११जुलै) रोजी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पो. ना. अर्जुन दारकुंडे पो. कॉ. गणेश मैड, पो. कॉ. घोंगडे हे पेट्रोलिंग करीत असताना तीनचारी कोकमठाण शिवारात किरण दिलीप बेंडकुळे (२५) राहणार महेश्वरी नगर कोळपेवाडी हा लाल रंगाच्या बजाज प्लेटिना मोटरसायकल क्रमांक एम एच १७ सी जी २६२२ वर संशयास्पद फिरताना आढळून आला अधिक चौकशी करता त्याने मोटरसायकल चोरीची असल्याचे कबूल केले व यापूर्वीही आपण गणेश उत्तम पवार (२३) कोळगाव माळ, सिन्नर व रोहित बाबासाहेब मोकळ (२०) कोळगाव माळ, सिन्नर या दोघांच्या मदतीने काळया रंगाची होंडा स्प्लेंडर, लाल रंगाची बजाज प्लेटिना व काळ्या रंगाची होंडा अशा तीन गाड्या चोरल्याची कबुली दिली. या तीनही आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून तीन मोटारसायकली ताब्यात घेतल्या आहेत. कोपरगाव शहर  पोलिसांनी ही धाडसी कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक वासुदेव देसले , सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत नागरे , पो. ना. अर्जुन दारकुंडे पो. कॉ. गणेश मैड पो. कॉ. घोंगडे,पो. कॉ.राम खारतोडे, पो. कॉ. गणेश थोरात म. पो. कॉ. त्रिभुवन, दिवे, कानवडे, बनकर यासह अधिकारी व अंमलदार यांनी कारवाई केली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page