सोनाली गायकेला आत्महत्येस प्रवृत्त केलेल्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल ;एक दिवस पोलीस कोठडी
Sonali Gayake charged with inciting suicide; one day in police custody
कोपरगाव : तालुक्यातील तिळवणी येथील विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तिच्या कुटुंबातील पती, सासू , सासरे व दोन दिर यांच्या विरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, १४ जुलै २०२१ रोजी पती, सासू-सासऱ्यांचा मानसिक, शारीरिक छळाला व विकृतीला कंटाळून विवाहिता सोनाली धनंजय गायके (२८) या युवतीने राहते घरी तिळवणी येथे आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. सोनाली हीचा विवाह झाल्यानंतर सहा महिन्यापासून आजतागायत माहेराहून पैसे आण म्हणून सासरवासीयांकडून वेळोवेळी तिचा मानसिक व शारीरिक छळ होत होता. शेवटी छळाला कंटाळून तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणून मयत सोनालीचे वडील दादासाहेब हरिभाऊ खटकाळे (५२)रा. लौकी, दहेगाव यांनी धनंजय भाऊसाहेब गायके (पती), भाऊसाहेब भागाजी गायके (सासरा), लिलाबाई भाऊसाहेब गायके (सासू), सागर भाऊसाहेब गायके (दिर), मनोज भाऊसाहेब गायके (दिर) सर्व राहणार तिळवणी तालुका कोपरगाव यांच्याविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सपोनि सुरेश आव्हाड हे करीत आहेत.