राजकारण बाजूला ठेवा, एकत्रित या,  गावचा विकास सहज शक्य – आ आशुतोष काळे

राजकारण बाजूला ठेवा, एकत्रित या,  गावचा विकास सहज शक्य – आ आशुतोष काळे

Put politics aside, come together, village development is easily possible –  MLA Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Sat17July 19:30

कोपरगाव : राज्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेवून महाविकास आघाडी सरकार अतिशय चांगल्या प्रकारे काम करीत आहे. ग्रामपंचायतीने देखील गट तट व राजकारण बाजूला ठेवून एकत्रित आल्यास  प्रत्येक गावाचा विकास करणे सहज शक्य असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी डाऊच खुर्द अंगणवाडी इमारत लोकार्पण  व चांदेकसारे प्राथमिक शाळा इमारत भूमिपूजन प्रसंगी केले.

आ. काळे म्हणाले की, साडेचार वर्षापूर्वी  ग्रामीण भागातील जनतेने मोठ्या विश्वासाने दिलेली जबाबदारी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे करून समर्थपणे पार पाडली. तोच विश्वास विधानसभेला माझ्यावर दाखविला. मतदार संघातील आरोग्य, शिक्षण रस्ते पाणी आणि वीज या प्रश्नांना दिले आहेत. गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी पाठपुराव्यामुळे २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात ४०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून प्रत्येक वर्षाला १०० कोटी पैकी चालू वर्षी आजपर्यंत ५५ कोटी रुपये निधी मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारकडून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.          

  याप्रसंगी सभापती पोर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, सदस्य सौ. अनुसया होन, अनिल कदम, ॲड. राहुल रोहमारे,  कारखान्याचे संचालक आनंदराव चव्हाण, रोहीदास होन, गौतम बँकेचे व्हा. चेअरमन धोंडीराम वक्ते,गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे, सरपंच संजय गुरसळ, उपसरपंच स्वाती रणधीर, संतोष पवार, शंकरराव गुरसळ, पंकज पुंगळ, बालमभाई सय्यद, भास्करराव होन, शंकरराव चव्हाण, राहुल जगधने, खातीबभाई सय्यद, दिगंबर पवार, सलिम शेख, कल्याण गुरसळ, भगीरथ होन, सुभाष होन, भिमाजी होन, द्वारकानाथ होन, राजेंद्र औताडे, नंदकिशोर औताडे, शंकरराव औताडे, शरद होन, देवेन रोहमारे, सुभाषजी होन, भिमाजी होन, द्वारकानाथजी होन, भास्कर होन, राजेंद्र औताडे, विलास चव्हाण, कर्णा चव्हाण, शंकरराव औताडे,  विठ्ठल होन,  आर.आर. होन, मोहन गुजर, नूरमोहम्मद शेख, भिमाजी होन, राजाभाऊ होन, भगीरथ होन, दौलतराव होन, अर्जुन होन, भास्कर होन, डी.जी. शेख, सय्यदबाबा शेख,मधूकर खरात, शरद होन, हसन सय्यद, मतीन शेख, किरण होन, विश्वनाथ होन, रवींद्र खरात, धीरज बोरावके, युनूस शेख, अशोक होन, पंकज होन, सागर होन, दादासाहेब होन, पुंजाजी होन, द्वारकानाथ होन, सुनील खरात, कांतीलाल होन, सचिन होन, किरण पवार, फारुख शेख, मन्सूर शेख, पंचायत समिती गटविकास अधिकारी सचिनजी सूर्यवंशी, उत्तमराव पवार, केंद्रप्रमुख निळे सर, कुलधरण मॅडम, ग्रामसेवक सुकेकर आदि मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page