पाच लाख खंडणीसाठी ३५ वर्षांच्या तरूणाचे अपहरण

पाच लाख खंडणीसाठी ३५ वर्षांच्या तरूणाचे अपहरण

35-year-old kidnapped for Rs 5 lakh ransom

दोन महिला सह पाच आरोपींना अटक, तरुणाची सुखरुप सुटका,Five accused along with two women arrested, youth released safely

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Sun 18July 18:30

कोपरगाव : पाच लाख खंडणीसाठी ३५ वर्षांच्या विवाहित तरूणाचे अपहरण करणार्‍या एका टोळीचा कोपरगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी या संपूर्ण कटाच्या सूत्रधार महिलेसह पाचजणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या तावडीतून या तरुणाची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

तक्रारदार भावना सचिन जाधव, (३०) रा. स्वामी जनार्दन नगर नगर चौकी रोड मनमाड येथे कुटुंबियांसोबत राहत असून १५ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता कोपरगाव बस स्टँड येथून त्यांच्या पती सचिन वसंत जाधव (३५) याचे चे प्रमिला पवार यांच्या सांगण्यावरून दोन अनोळखी पुरुष व एक महिला यांनी बळजबरीने पांढऱ्या रंगाच्या इंडिका कार मध्ये बसून पाच रुपये पाच लाख खंडणीसाठी पळवून नेले हा प्रकार तक्रारदाराच्या लक्षात येताच त्यांनी कोपरगाव शहर पोलिसांत तक्रार केली होती.

या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत या गुन्ह्यांचा तपास सुरू असतानाच पोलीसांना घरात डांबून ठेवलेल्या या तरुणाची सुटका केली. या तरूणाच्या अपहरणाच्या गुन्ह्यांत प्रमिला महेश पवारसह तिच्या एकनाथ भाऊसाहेब हाडवळे (५४) रा. राजुरी ता. जुन्नर, भाऊसाहेब विठ्ठल काळे (४०) समर्थ नगर, आळेफाटा, प्रवीण रबाजी खेमनर (२८) अंभोरे तालुका संगमनेर, सीमा भाऊसाहेब काळे (३५) समर्थ नगर आळेफाटा, या चार साथीदारांना अटक करून त्यांच्याकडील पांढऱ्या रंगाची सहा लाख रुपये किंमतीची इर्टीका कार व दहा हजाराचे दोन मोबाईल असा सहा लाख दहा हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

कोपरगाव शहर पोलिसांनी ही धाडसी कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक वासुदेव देसले , सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत नागरे , पो. ना. फुरखान शेख, पो. कॉ. गणेश थोरात म. पो. कॉ. पी. बी. बनकर म. पो. कॉ. विजया दिवे, होमगार्ड दिपक गर्जे यासह अधिकारी व अंमलदार यांनी कारवाई केली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page