कोपरगाव बसस्थानकाचे काम अंतिम टप्प्यात -सौ. स्नेहलता कोल्हे
Work of Kopargaon bus stand in final stage – Mrs. Snehalta Kolhe
जाणून घ्या, काय आहेत सुविधा ? Know, what are the facilities?
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Tue 20July 20:00

कोपरगाव : शिर्डी हे आंतरराष्ट्रीय देवस्थान असल्याने कोपरगाव बस स्थानकातून लांब पल्ल्याच्या बस गाड्या धावत असतानाही नगर विभागातील प्रलंबित असलेल्या कोपरगाव बसस्थानक इमारतीचा प्रश्न मार्गी लागला असून ५ कोटी ९३ लाखाचे एक भव्य सुसज्ज बसस्थानक हे प्रवाशांच्या व साईभक्तांच्या दृष्टीने सोय व्हावी यासाठी उभारण्यात आले आहे. या स्थानकावर येत्या महिनाभरात प्राथमिक सर्व व सोयी – सुविधांची कामे पूर्ण केली जाणार असल्याची माहिती माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली.
युती सरकारच्या काळात तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सततचा पाठपुरावा करून कोपरगावच्या वैभवात भर टाकणारी बसस्थानक इमारतीसाठी ५ कोटी ९३ लाखाचा निधी मंजूर करून आणला, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते २३ जानेवारी २०१९ रोजी
माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन संपन्न केले होते.
सौ स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, नव्या बसस्थानकात प्रशस्त बसथांबा, हिरकणी विभाग, जनेरिक मेडीसीन, रसवंती, कॅन्टींग, पार्सल आॕफिस, शालेय पास विभाग, चौकशी विभाग, पोलीस चौकी, बुक स्टाॅलसह इतर ३ गाळे असुन स्त्री पुरूष व अपंग यासाठी सुलभ शौचालय मुतारीची सोय करण्यात आली असून पहिला मजला – सुसज्ज पुरूष व महिला विश्रांतीगृह, शासकिय अधिकारी अतिथीगृह, लेखा विभाग व वित्तीय विभाग,आगार प्रमुख निवासस्थान, अशा सर्व सोयी – सुविधां करण्यात आल्या आहेत.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सौ स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, असंख्य नागरिक, नोकरदार बांधव, व्यावसायिक, महिला भगिनी, विद्यार्थी विद्यार्थीनी या ग्रामीण भागातून शिक्षणाच्या निमित्ताने कोपरगाव शहरात येतात, त्याच प्रकारे कोपरगाव शहरातील नागरिक प्रवास करण्यासाठी बाहेर जातात या सर्वांची गैरसोय होऊ नये यासाठी हे बसस्थानक लाभदायक ठरणार असून माझे कार्य सार्थकी लागणार आहेत.
बस स्थानकाची रंगरंगोटी नुकतीच पूर्ण झाली आहे विजेची व लाईटची चाचणीही पूर्ण झाली आता आवारातील कॉंक्रिटीकरणाला सुरुवात केली जात आहे. तातडीने काम पूर्ण व्हावे यासाठी आगार व्यवस्थापक अभिजीत चौधरी, सोनवणे कन्सट्रक्शनचे नमन शेट्टी, कुणाल सोनवणे या कामावर लक्ष ठेवून आहेत.
पुर्णत्वानंतर हस्तांतरण झाल्यानंतर बसस्थानका ला उद्घाटनाची प्रतिक्षा राहिल.





