महावितरणच्या उभ्या खांबावरील विद्युत तार चोरणारे तीन जण जेरबंद …!
Three arrested for stealing electrical wires on vertical poles of MSEDCL …!
६५ हजाराचा मुद्देमाल जप्त संवत्सर , गणपती तळे परीसरातील घटना कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Tue 20July 19:30
कोपरगाव ; तालुक्यातील संवत्सर , गणपती तळे परीसरातील घटना, महावितरणच्या उभ्या खांबावरील अंदाजे ७२० फुट विजेची तार चोरट्यांकडे मिळून आल्याची घटना घडली असून या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता .
कोपरगाव शहर पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, तालुक्यातील संवत्सर , गणपती तळे परीसरातील महावितरण कंपनीचे विद्युत पुरवठा करणारे खांब आहेत. बुधवारी १४ येथिल उभ्या विद्युत खांबावरील ७२० फुट तार कोणीतरी कापुन पळवून नेल्याचे निदर्शनास आले.याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या तक्रारीवरून पुढील तपास करीत असताना गुप्त बातमीदार माहितीनुसार संशयित आरोपी अशोक उर्फ मुकेश उत्तम बोर्डे याची कडे विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देऊन गुन्हा करताना भरत मच्छिंद्र वन्से (२५) लोणी, तालुका वैजापुर व शिवा निवृत्ती गायकवाड (३०) हिलालपूर तालुका वैजापुर यांनी साथ दिली असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी शिवा गायकवाड याला हिलालपुर येथून ताब्यात घेतले असता त्याच्याकडून पस्तीस हजार रुपयाची सातशे वीस मीटर लांबीची ३४ स्क्वेअर फूट जाडीची तार मिळाली, तसेच या गुन्ह्यातील तीन आरोपीसह गुन्ह्यात वापरलेली काळया रंगाची बजाज प्लेटिना असा ६५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला, कोपरगाव शहर पोलिसांनी ही धाडसी कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या नेतृत्वाखाली पोसई भरत नागरे, पोलीस नाईक अर्जुन दारकुंडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश मैड, पोलीस कॉन्स्टेबल बी.बी. घोंगडे, मपोकॉ.पी.बी. बनकर यांनी भाग घेतला.





