आवर्तनाचा लाभ समप्रमाणात अकरा गावांना देण्याचे नियोजन करा-आ. आशुतोष काळे

आवर्तनाचा लाभ समप्रमाणात अकरा गावांना देण्याचे नियोजन करा-आ. आशुतोष काळे

Plan to give the benefit of rotation to eleven villages equally.  MLA Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Sat 24July 16:00

 कोपरगाव : गोदावरी कालव्यांच्या सुरु आवर्तनाचा लाभ राहाता तालुक्यातील त्या अकरा गावांना देखील समप्रमाणात मिळण्यासाठी योग्य नियोजन करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत दिल्या. राहाता तहसील कार्यालयात आमदार आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभाग, महसूल विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग, पंचायत समिती, वीज वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागांची आढावा बैठकीत बोलत होते.

राहाता तालुक्यातील नागरीकांच्या विविध अडचणी व समस्या समजावून घेत या समस्या तातडीने सोडवण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. अकरा गावांमधील वाकडी, चितळी, पुणतांबा, रामपूरवाडी आदि महत्वाच्या रस्त्यांच्या कामांना निधी मिळविण्यात यश मिळाले आहे. पुढील काळात उर्वरित रस्त्यांसाठी निधी मिळवणार आहे. कामे सुरु असलेल्या रस्त्यांवर आवश्यक तिथे पुल व मोऱ्यांची बांधकामे करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत . महावितरण ज्याप्रमाणे गावठाणच्या विजेचे प्रश्न वेळेत सोडवितात तेवढीच तत्परता कृषी पंपांना वीजपुरवठा करणाऱ्या विजेचे प्रश्न निर्माण झाल्यास दाखवावी. लसीकरणाचे योग्य नियोजन करा. नागरिकांना विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना त्रास होणार नाही याची आरोग्य विभागाने काळजी घेण्याच्या सूचना आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या.

यावेळी तहसीलदार कुंदन हिरे, केएसके कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, गौतम बँक चेअरमन बाबासाहेब कोते, जिनिंग चेअरमन गोरक्षनाथ जामदार, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, पाटबंधारेचे महेश गायकवाड, वीज वितरणचे अभियंता विठ्ठल सोनवणे, दिनेश पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के, डॉ. कुंदन गायकवाड, डॉ. स्वाती घोगरे, राहाता राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकुमार सदाफळ, अनिल कोते, अरुण बोंबले, दिलीप चौधरी, अण्णासाहेब कोते, संजय धनवटे, शिवाजीराव जगताप, मच्छिंद्र चौधरी, डॉ. प्रदीप उगले, कोपरगाव मतदार संघात समाविष्ट असलेल्या राहाता तालुक्यातील ११ गावांचे तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page