इफको नॅनो युरिया विक्रीचा कोपरगावात शुभारंभ – विवेक कोल्हे.

इफको नॅनो युरिया विक्रीचा कोपरगावात शुभारंभ – विवेक कोल्हे.

IFFCO Nano Urea Sale Launched in Kopargaon – Vivek Kolhe.

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Fir 23July 20:00

कोपरगाव : जगभरातील शेतकऱ्यांकरता इफकोने  पहिल्यांदाच नॅनो युरिया लिक्विड उत्पादन केले असून त्याच्या विक्रीचा शुभारंभ कोपरगाव शेतकरी सहकारी संघ येथे शुक्रवारी इफको आरजीबी सदस्य व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला, अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे होते.

      प्रारंभी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष संभाजीराव गावंड, उपाध्यक्ष विलासराव कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.   याप्रसंगी संचालक सर्वश्री. बबनराव निकम, वाल्मीक भास्कर, विजय रोहम, चंद्रकांत देवकर, कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, रघुनाथ फटांगरे आदी उपस्थित होते.          

 श्री. विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत व आत्मनिर्भर कृषीच्या धर्तीवर देशी मालकीचे तंत्रज्ञान विकसित व्हावे यासाठी विशेष धोरणात्मक निर्णय घेतले.   त्यानुसार इफको या संस्थेने  बायोटेक्नॉलॉजी संशोधन केंद्रात संशोधित करून नॅनो युरिया लिक्विड उत्पादन घेतले.   त्याच्यi विविध ठिकाणी असंख्य पिकावर, राष्ट्रीय कृषी संशोधन यंत्रणा अंतर्गत वीस संशोधनपर संस्था, राज्य कृषी विद्यापीठे, केव्हीके केंद्रे येथे ४३ पिकावर तर देशातील ११ हजार शेतकऱ्यांच्या शेतातील ९४ पेक्षा अधिक पिकांवर चाचण्या घेण्यात आल्या, त्यातून पीक उत्पादनात आठ टक्के वाढ दिसून आली.   या नॅनो युरियामुळे पिकाला बळकटी, आरोग्यदायक व आर्द्रता परिणाम संरक्षित करते.  नॅनो  युरिया लिक्विड ५०० मिली बॉटल स्वरूपात २४० रुपयास विक्रीस उपलब्ध आहे. याच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनात जास्तीत जास्त वाढ होते. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शेवटी विवेक कोल्हे यांनी केले.   व्यवस्थापक हरिभाऊ गोरे यांनी आभार मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page