कु.श्वेतांबरी राऊतने एम.फील. ची पदवी मिळवली
Ms. Shwetambari Raut has done M.Phil. Degree
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Sat 24July 16:30
कोपरगाव : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये “आकलन आणि चिकित्सक अभ्यास” या विषयावर प्रबंधिका सादर करून कु. श्वेतांबरी रमेश राऊत या विद्यार्थ्यांने एम.फील. ची पदवी मिळवली आहे.
श्रीरामपूरच्या रावबहादुर नारायणराव बोरावके महाविद्यालयामध्ये मराठी विभागाचे पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त एम.फील व पीएच.डी चे संशोधन केंद्र आहे. या संशोधन केंद्रात २८ एप्रिल २०२१ रोजी मराठी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम गीतकार बाबासाहेब सौदागर यांच्या ” पायपोळ” आत्मचरित्राचे “आकलन आणि चिकित्सक अभ्यास” हा विषय घेऊन एक संशोधन प्रबंध मार्गदर्शक (गाईड) रा.ब.नारायणराव बोरावके महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख प्रा. शीला गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला होता. सदरचा प्रबंध मान्य करुन कु.श्वेतांबरी राऊत यांना पुणे विद्यापीठाची एम.फील पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या यशाबद्दल भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे, रयत शिक्षण संकुलाच्या चेअरमन मीनाताई जगधने प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड, संशोधन केंद्राच्या प्रमुख प्रा. डॉ. उज्वला भोर, प्रा. डॉ. बाळासाहेब शेळके, प्रा. डॉ. भास्कर निफाडे, प्रा. डॉ. बाळासाहेब गार्डी, प्रा. डॉ. राजेंद्र बावळे, डॉ. बाबुराव उपाध्ये, प्रा. डॉ. निर्मला कुलकर्णी, दत्तात्रय विरकर सर, प्रा.डॉ. दत्तात्रय गाडे. छायाचित्रकार हेमचंद्र भवर, डॉ. दादासाहेब गलांडे आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,





