कृषी कन्येचे ब्राम्हणगाव येथे माती परीक्षणावर मार्गदर्शन
Krishi Kanye’s guidance on soil testing at Bramhangaon
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Sun 25July 12:00
कोपरगाव : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न कर्मवीर काकासाहेब वाघ कृषी महाविद्यालयातील कृषीकन्या प्रांजल रविंद्र शिंदे हिने ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि कृषी औद्योगीक संलग्नता या कार्यक्रमांतर्गत अभ्यास दौऱ्यात कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे शेतकऱ्यांना माती परीक्षण का करावे याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
यावेळी कृषीकन्या प्रांजल शिंदे हिने
जमिनीत पीक वाढीसाठी कोणत्या अन्न द्रव्याची कमतरता आहे हे तपासणे आणि ती भरून काढण्यासाठी काय करणे आवश्यक आहे हे ठरवता यावे या करिता माती परीक्षण आवश्यक आहे. तसेच अधिक रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनिची हानी होत आहे . माती परीक्षण केल्यामुळे जमिनीतील मुख्य अन्नद्रव्य नत्र स्पृरत पालाश यांचे प्रमाण कळते. माती परिक्षणाचे फायदे, मातीत आढळणारे विविध पोषक घटक व त्यांचे महत्त्व, सध्याचा मृदेचा होणारा ऱ्हास व माती परिक्षण शिबिरांची गरज.माती परीक्षण कसे आणि का करावे ? याचे बहुमोल मार्गदर्शन केले.
संबंधित कृषीकन्या प्रांजल शिंदे हिला क. का. वाघ कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतिषकुमार हाडोळे प्रा. परमेश्वरी पवार व प्रा. सुनील बैरागी यांचे मार्गदर्शन लाभले असल्याची माहिती कृषिकन्येने दिली.
यावेळी उपस्थित शेतकयांनी तिचे कौतुक ही केले आणि तिला पुढील अभ्यास दौ-यास शुभेच्छा दिल्या.शेतकऱ्यांनी सुद्धा या कार्यशाळेत बहुमोल असा प्रतिसाद नोंदवला.





