संजीवनी पाॅलीटेक्निकच्या विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड -अमित कोल्हे
Selection of Sanjeevani Polytechnic students in various reputed companies – Amit Kolhe
इन्फोसिस, स्नॅयडर, एल अँड टी, केपीआयटी, मित्तल स्टील व फिलीप्स Infosys, Snyder, L&T, KPIT, Mittal Steel and Philips
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Mon 26July 18:00
कोपरगांव: सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पालकांच्या स्वप्नांना सत्यात उतरविण्याचे काम संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने अखंडपणे चालु आहे. अलिकडेच सहा कंपन्यांनी संजीवनीच्या मेकॅॅनिकल, इलेक्ट्रिकल, काॅम्प्युटर व इलेक्ट्रिाॅनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागाच्या १२ विद्यार्थ्यांची ऑनलाईन पध्दतीने मुलाखती घेवुन त्यांच्या अंतिम निकालाच्या अगोदरच नोकऱ्यांसाठी निवड केली, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली .
श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की चालु शैक्षणिक वर्षात संजीवनी पाॅलीटेक्निकने गरजु ३०४ विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या देवुन एक नवा आयाम प्रस्थापित केला आहे. उर्वरीत विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेण्याचे पसंद केले. अलिकडेच निवड झालेल्या १२ विद्यार्थ्यांपैकी स्नॅयडर इलेक्ट्रिक कंपनीने संगीता मच्छिंद्र पगारे हिची निवड केली. अर्सेलर मित्तल निपाॅन स्टील कंपनीत मेहराज आखिल शेख याची निवड झाली. इन्फोसिसने आदित्य दत्तात्रय सोनवणे व विशाल ज्ञानेश्वर रंधे यांची निवड केली. एल अँड टी डीफेन्स या कंपनीने अक्षदा हेमकांत वानखेडकर, महेश दत्तात्रय उदे, कमलेश सुधाकर काटकर व प्रशांत शंकपाळ शेलार यांची निवड केली. केपीआयटी कंपनीने शिवानी रमेश देवकर व अनुराग महेश कोतवाल यांची निवड केली तर फिलीप्स कंपनीत नम्रता कमलाकर कसबे व आदित्य दत्तात्रय सोनवणे यांची निवड केली. पाहीजे त्या विद्यार्थ्याला नोकरी मिळवुनच द्यायची, यासाठी संजीवनी अनोखा पॅटर्न राबवित आहे. याची फल निष्पत्ती म्हणुन आज ग्रामिण भागातील विध्यार्थी वय वर्ष १९ व्या वर्षी नोकरदार होवुन कुटूंबाचा आधार बनत आहे. मागील अनेक वर्षांपासून ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवुन देण्याचे काम अखंडपणे चालु ठेवले आहे, यामुळे संजीवनीने अहमदनगरसह शेजारील जिल्ह्यांमध्येही विश्वासहर्ता निर्माण केली आहे. सध्या पाॅलीटेक्निकची प्रथम व थेट द्वीतिय वर्षाची प्रवेश प्रक्रिया चालु असुन संजीवनी मध्ये महाराष्ट्र शासनाचे अधिकृत प्रवेश व मार्गदर्शन केंद्र सुरू असुन येथे अनेक पालक व विद्यार्थी या सुविधेचा फायदा घेत आहे, असे श्री कोल्हे शेवटी पत्रकात म्हणाले. विध्यार्थ्यांच्या नामांकित कंपन्यामधील नोकऱ्यांसाठीच्या निवडीबध्दल माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व यशस्वी विध्यार्थ्यांचे तसेच प्राचार्य ए. आर. मिरीकर व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. आय. के. सय्यद यांचे अभिनंदन केले.