गुरव समाजाचे प्रश्न मार्गी लावू – ना.बाळासाहेब थोरात

गुरव समाजाचे प्रश्न मार्गी लावू – ना.बाळासाहेब थोरात

Let’s solve the problems of gurav Samaj – Na. Balasaheb Thorat

 मुंबईत ऑगस्टमध्ये बैठक

ना. बाळासाहेब थोरात यांना गुरव समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन देतांना गुरव समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. अण्णासाहेब शिंदे आ. डॉ. सुधीर तांबे वसंत बंदावने मीनानाथ पांडे आदी दिसत आहेत.

कोपरगाव : माझ्या मतदार संघातच नव्हे तर महाराष्ट्रातील गुरव समाजाने माझ्यावर नेहमीच प्रेम केले. या समाजाचे अनेक प्रश्न आहेत तर लॉकडाऊनमुळे काही नव्याने निर्माण झाले आहेत. या सगळ्या प्रश्नांचा अभ्यास करून ते सोडवण्याच्या दृष्टीने मुंबई मंत्रालयात येत्या ऑगस्ट महिन्यात मिटिंग लावू. असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

 संगमनेर येथे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. अण्णासाहेब  शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित  अखिल गुरव समाज संघटनेच्या राज्यस्तरीय मीटिंगमध्ये बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधान परिषद सदस्य आमदार डॉ.सुधीर तांबे, जिल्हा परिषद सदस्य व काँग्रेस गटनेते अजय फटांगरे , मानद अध्यक्ष वसंत बंदावणे, गुरव नेते मिनानाथ पांडे, राज्याध्यक्ष सुधाकर खराटे, सरचिटणीस सुभाष शिंदे, निलेश क्षीरसागर, धनंजय दरे, उपस्थित होते.

संघटन ही काळाची गरज आहे व गेल्या १४ वर्षांपासून गुरव समाज संघटित होऊन लढत आहे. त्यामुळे अनेक प्रश्न सुटतात.ही चांगली गोष्ट असून मी विधान परिषदेत आपल्या प्रश्नांचा पाठपुरावा करील. असे डॉ.तांबे म्हणाले.

ॲड.अण्णा शिंदे यांनी संघटनेची चौदा वर्षाची वाटचाल व संघर्ष याचा आढावा घेतला. संपूर्ण महाराष्ट्रात तळागाळात पोचलेली ही एकमेव संघटना असल्याचे ते म्हणाले. गुरव समाजासमोरील इनाम वर्ग ३ च्या जमिनी, मुलांच्या वसतिगृह व शिक्षणाचा प्रश्न, आरक्षण, मंदिरे खुली करणे, पुजाऱ्यांना मानधन व मदत , जिल्हा बँकांचे कर्ज अशा अनेक प्रश्नांचा उहापोह त्यांनी आपल्या भाषणात करून त्यांचे निवेदन नामदार थोरात यांनी दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना वसंत बंदावणे म्हणाले की, राज्यभरातून प्रतिनिधी बाळासाहेबांच्या प्रेमापोटी उपस्थित आहेत.ना. बाळासाहेब थोरात आमच्या मागण्यांना न्याय देतील असा आम्हाला विश्वास आहे. यावेळी गुरव समाजातील नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार ना. थोरात यांचे हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवाध्यक्ष इंजि.योगेश पवार यांनी केले. आभार जिल्हाध्यक्ष (ऊत्तर) अशोक पांडे यांनी मानले.

कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष अशोक पांडे, महेश शिर्के, तालुकाध्यक्ष दत्ता बंदावणे, रमेश क्षीरसागर , महिला संघटक वंदना बंदावणे, बंशी पांडे, अंबादास पवार, डॉ.जयवंत गुरव, शारदा शिंदे, सारंग पांडे, संपत पवार, प्रशांत चौधरी, सुशील पारासुर, प्रा.अविनाश पांडे शंकरराव शिंदे व आदिनाथ शिंदे व अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page