सैनिक भवनला जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू  :आ. आशुतोष काळे

सैनिक भवनला जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू  :आ. आशुतोष काळे

We will try to make space available for Sainik Bhavan: MLA Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: wen 28July 8:20

कोपरगाव :  देशसेवेसाठी सैनिकांनी दिलेल्या बलिदानामुळेच आज सर्वसामान्य माणूस आपल्या देशांमध्ये सुरक्षित असून कोपरगाव तालुक्यातील अनेक सुपुत्रांनी देशसेवेसाठी वाहून घेतलं असुन अनेक शूर जवानांना वीरमरण देखील आले आहे. या सैनिकांप्रती माझ्या मनात नेहमीच आदर भावना असून अनके दिवसांपासून सैनिक भवनसाठी असलेली जागेची मागणी पूर्ण करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली.

कारगिल विजय दिनानिमित्त आमदार आशुतोष काळे यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या भारत मातेच्या वीर शहीद जवानांना अभिवादन करून मतदारसंघातील सेवानिवृत्त सैनिक व वीरपत्नी श्रीमती सरला जाधव यांचा सन्मान केला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, एक्स सर्विसमेन असोसिएशनचे अध्यक्ष युवराज गांगवे, शांतीलाल होन, रामनाथ वर्पे, सचिन चोळके, शहीद जवान अमोल जाधव यांच्या वीरपत्नी श्रीमती सरला जाधव, विकास जगताप, भाऊसाहेब निंबाळकर, सुभाष खिल्लारे, शिवाजी निकम, सुखदेव काळे, विकास मुळेकर, नितीन कुहिले, दत्तात्रय पगार,अनंत डिके आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना आमदार आशुतोष काळे म्हणाले की, थंडी, ऊन, वादळवारा, पाऊस, असो, याची तमा न बाळगता जीवावर उदार होऊन आपल्या कुटुंबाचा विचार न करता देशाच्या सीमेवर भारतीय सैनिक डोळ्यात तेल घालून आपल्या देशाचे संरक्षण करतात. त्यामुळे आपण सर्व सण-उत्सव आपल्या कुटुंबासमवेत साजरे करून सुखाने झोपू शकतो. सैनिकांप्रती असलेल्या आदर भावनेतून सैनिक भवनसाठी  जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू व जागा उपलब्ध झाल्यानंतर सैनिक भवनसाठी निधी देखील मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Leave a Reply

You cannot copy content of this page