गांधी विचार शृंखले ऑनलाईन शिबिरात सोमैयाचे महाविद्यालयाचे ११ विद्यार्थी सहभागी
11 students of Somaiya College participated in the Gandhi Vichar series online camp
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: wen 28July 8:00
कोपरगाव :गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव द्वारा ‘गांधी विचार शृंखले’ अंतर्गत महाविद्यालयीन युवकांसाठी आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन शिबिरात स्थानिक के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या ११ विद्यार्थ्यांनी सहभागी होत या चार दिवसीय शिबिरातील प्रेरक व्याख्यानांचा लाभ घेत मुक्त चर्चेत सहभाग नोंदविल्याची माहिती प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी येथे दिली.
या ऑनलाइन शिबिरात कु. गौरी दिवटे, योगेंद्र मुळे, कु. आलिया सय्यद, अक्षय रटनालू, कु. रेणुका हलवाई, वैभव बिडवे, कु.लिना येवले, योगेश भामरे, प्रीतम साळी, मंगेश गुंजाळ, नामदेव कुदनर या विद्यार्थ्यांनी शिबिरात सहभाग नोंदविला. या शिबिरात डॉ. सुदर्शन अय्यंगर (माजी कुलगुरू गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद) डॉ.विरल देसाई (बडोदा) व मा. तुषार गांधी (महात्मा गांधी यांचे पणतू) यांची ‘आजचा युवक व महात्मा गांधीजींचे विचार’ या संदर्भात प्रेरक व्याख्याने झाल्याची माहिती समन्वयक प्रा. डॉ. जिभाऊ मोरे यांनी दिली. शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना गांधी फाउंडेशन, जळगाव द्वारा आकर्षक प्रमाणपत्रेही देण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव ऍड. संजीवदादा कुलकर्णी, सदस्य संदीप रोहमारे व कार्यालयीन अधिक्षक डॉ. अभिजीत नाईकवाडे यांनी अभिनंदन केले आहे.