बुलेट चोरी; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
Bullet theft; Filed a crime against anonymity
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: wen 28July 9:15
कोपरगाव : गांधीनगर घरासमोरील बुलेट दुचाकी अज्ञाताने चोरून नेल्याची घटना घडली असून, याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, सिध्दांत रमेश वाघ (३१) हे कोपरगाव गांधीनगर येथे बेकरी व्यवसाय करीत असून, ते तेथेच लगतच वास्तव्यास आहेत. सिध्दांत वाघ यांनी आपल्या मालकीची काळे रंगाची बुलेट रॉयल इनफिल्ड क्लासीक ३५० मॉडेलची मो.सा.नं. एम एच १७ बी. टी. ७१७१ तिचा चेशी नं.एम ई ३ यू ३५५ सी. आय. जी. एन. ०४२८३० व इंजिन नं. यू ३५५ सी. ओ.जी.एन. २१६३०० असा असलेली ही सोमवारी (२६ जुलै) रोजीचे रात्री ८ वाजता स्वत:हाच्या घरासमोर लावली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी (२७जुलै) रोजीच्या सकाळी ८ वाजता ते पुन्हा आणण्यासाठी गेले असता, या ठिकाणी गाडी दिसत नसल्याने त्यांनी आजूबाजूला परिसरात शोध घेतला; परंतु गाडी कुठेही मिळून आली नाही. तसेच घरातील व नातेवाईकांकडे व मित्रमंडळी यांच्याकडेही शोध घेतला; परंतु गाडी मिळून आली नाही. म्हणून वाघ यांनी आपली बुलेट कुणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेली असल्याचे खात्री झाल्याने, त्यांनी मंगळवारी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा अधिक तपास कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील स.फौ. एस. सी.पवार तपास करीत आहेत.

ही. बुलेट मोटारसायकल आढळून आली आहे.
संपर्क – कोपरगाव ग्रामीण पोलिस स्टेशन & कोळपेवाडी आऊट पोस्ट.





