कोपरगाव तालुक्यात दिडशे दिवसांत २५ टक्के लोकांचे कोरोना लसीकरण पूर्ण,
In Kopargaon taluka, corona vaccination of 25% people has been completed in 150 days.
जाणुन घ्या, कोणत्या वयोगटातील किती जण? Find out, how many people in which age group?
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Thu 29July 9:20
कोपरगाव : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये कोपरगाव जिल्ह्यात चांगलीच आघाडी घेतली आहे. मंगळवारी २७ जुलै अखेरपर्यंत तब्बल २५% लोकांना लस (Covid vaccine) दिली गेली आहे, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली. लसीकरणाचा हा वेग आणखी वाढू शकतो. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाकडुन कोपरगावला अधिकाअधिक लसींचा पुरवठा होईल यासाठी प्रयत्न करु, असे डॉ.कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले. (Covid 19 vaccination in kopargoan )
कोरोना लसीकरणासंदर्भात माहिती देताना डॉ. कृष्णा फुलसौंदर म्हणाले, कोपरगाव मतदार संघाची लोकसंख्या २७४५५६ (अंदाजे ) २७ जुलैपर्यंत कोपरगावातील ६६ हजार ८७४ २५ % लोकांना लस देण्यात आली आहे. यात कोविशिल्ड ५५ हजार १२३ लोकांना तर कोवॉक्सीन १२ हजार ७२ लोकांना देण्यात आली असून यात ग्रामीण भागातील ४०६७३ लोकांना तर शहरी भागात २६ हजार २०१ लोकांचा समावेश आहे.नियोजन व समन्वयासाठी शहरातील कोपरगाव ग्रामीण रुग्णालय, आत्मा मलिक हॉस्पिटल, संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल या तीन ठिकाणी तर तालुक्यातील चासनळी, दहेगाव बोलका, पोहेगाव, संवत्सर, टाकळी- ब्राह्मणगाव व वारी या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण ठेवण्यात आले होते. २८ फेब्रुवारी ते २७ जुलै २०२१ या १५० दिवसात कंसात त्या केंद्रात झालेल्या लसीकरणाचे आकडे कोपरगावला आतापर्यंत लसीचे सुमारे ६६ हजार ८७४ डोसेस प्राप्त झाले असून त्यापैकी ६६ हजार ८२४ डोसेसचा वापर झाला आहे.५० डोस बाकी आहेत. कोपरगाव ग्रामीण रुग्णालय एकुन १७३०२डोस पैकी १०४१२पहिला डोस, तर६८९० दुसरा डोस, आत्मा मलिक हॉस्पिटल एकुन ५३७८डोस पैकी ३८७७ पहिला डोस, तर १५०२दुसरा डोस, संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल एकुन २६६४ डोस पैकी २६६४ पहिला डोस, तर ०० दुसरा डोस,कोपरगाव नागरी प्राथमिक केंद्रात एकुन ८५७ डोस पैकी ७१० पहिला डोस, तर १४७ दुसरा डोस,असे शहरात या चार ठिकाणी तर तालुक्यातील चासनळी(६७०१), दहेगाव बोलका(७०९५), पोहेगाव(७३०४), संवत्सर (६२१६), टाकळी- ब्राह्मणगाव (७६७०)व वारी (५६८७)या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण ठेवण्यात आले होते .या ठिकाणी ४०६७३ लोकांनी लसीकरण केले. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाटे यांनी दिली. अधिक माहिती देताना डॉ. संतोष विधाटे म्हणाले, कोपरगावात ६६ हजार ८७४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले, यात आरोग्य अधिकारी व कर्मचारी एकुन ३६७३ डोस पैकी २३३६ पहिला डोस, तर १३३७ दुसरा डोस घेतला., पोलिस,महसुल,नगरपालिका अधिकारी व कर्मचारी एकुन ३३८१ डोस पैकी २३३४ पहिला डोस, तर१०४७ दुसरा डोस घेतला. ,४५ ते ६० वर्षे वयोगटातील एकुन २५०१९ डोस पैकी १६१०७ पहिला डोस, तर ८९१२ दुसरा डोस घेतला. , ६० वर्षे वयोगटापेक्षा जास्त एकुन २४४८९ डोस पैकी १५६३० पहिला डोस, तर ८८५९ दुसरा डोस घेतला. १८ ते ४५ वर्षांवरील एकुन ९२४५ डोस पैकी ८६३३ पहिला डोस, तर ६१२ दुसरा डोस घेतला.३० ते ४४ वर्षांवरील एकुन २२० डोस पैकी २२० पहिला डोस, तर ००० दुसरा डोस घेतला. नियमित लसीकरण सत्र सुरू आहे , ज्यांना प्रशासनाकडून फोन किंवा मेसेज येईल त्यांनीच लसिकरणासाठी यावे, इतर कोणीही ग्रामीण रुग्णालय मध्ये येऊ नये. प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे यांनी केले आहे . डॉ. वैशाली बडदे पुढे म्हणाल्या, Covishield कोविशिल्ड च्या दोन डोसदरम्यानचं अंतर ४२ दिवस (६ ते ८ आठवडे) वाढवून ८४ दिवस (१२ ते १६ आठवडे ) केलं आहे. तसंच Covacine कोवॉक्सिन ४५ दिवस (६ ते ८ आठवडे) करण्यात आला आहे. लाभार्थ्यांचे पोर्टलवर व्हेरिफाय होणार आहे. अशी माहिती त्यांनी दिली आहे.