सावधान! शहरात चोरांचा सुळसुळाट, नागरिकांमध्ये घबराट

सावधान! शहरात चोरांचा सुळसुळाट, नागरिकांमध्ये घबराट

Be careful! Thieves roam the city, panic among citizens

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Thu 29July 9:30

कोपरगाव :शहरातील विविध भागात चोरट्यांनी हैदोस घातला असून घरफोडी, मोबाईल चोरी, दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरट्यांनी अनेक छोट्या-मोठ्या चोऱ्या केल्यानंतर त्याचा तपास लागत नसल्याने चोरट्यांनी पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे.

एकीकडे शहरात कल्याण मुंबई मटका अवैध धंदे राजरोसपणे सुरू असून त्याकडेही पोलिसांचे दुर्लक्ष आहे शहरातील गांधी चौक कापड बाजार गोकर्ण गणेश मंदिर लगत तसेच पांडे गल्ली सराफ बाजार येथेच अनेकांच्या घरांची कुलपे तोडून घरातील सामानाची उचकापाचक करण्यात आली चोरट्यांनी काही रोख रक्कम एक सायकल व काही वस्तू चोरून नेले आहे. असे चोरी झालेल्या नागरिकांनी सांगितले ब्राह्मण गल्लीतील विशाल कानडे हे पुणे येथे राहतात त्यांचे घराची कुलूप चोरट्यांनी तोडली मात्र घरात काहीच सापडले नाही सामानाची उचकापाचक केली गोकर्ण गणेश मंदिरा शेजारी प्रशांत खैरनार यांच्या घराचीही कुलूप तोडण्यात आले राहुल जंगम यांची एक सायकल चोरून नेली त्याच्यापुढे श्रीराम मेडिकल हेमंत चव्हाण यांचे घर फोडून सामानाची उचकापाचक करण्यात आली सराफ बाजारात शोभा पांडे यांच्या घरीही किरकोळ हजार एक रुपयाची रक्कम चोरट्यांनी चोरून नेली दिनांक २३ रोजी वृत्तपत्र विक्रेते प्रकाश ठोंबरे यांचे चिरंजीव शेखर ठोंबरे यांची पांढऱ्या रंगाची बोलेरो जीप क्रमांक एम एच १७ झेड ३०६६ रात्री दीड वाजता अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली बिरोबा चौकातील शैलेश साबळे यांची रसराज मेडिकल आतापर्यंत तीन वेळा फोडण्यात आले २७ डिसेंबर २०२० रोजी मागच्या बाजूने मेडिकल फोडून ४२ हजार व मोबाईल चोरीला गेला होता त्यानंतर १४ जून रोजी पुन्हा शटर तोडून चोरीचा प्रयत्न झाला संभाजी सर्कल जवळ रसराज मेडिकेअर मध्ये मेडिकल फोडण्याचा प्रयत्न झाला या सर्व घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे पोलिसांनी आतापर्यंत केवळ पंचनामे केले चोरीचा तपास लावण्यात मात्र त्यांना अपयश आले असे साबळे यांनी सांगितले २० जुलै रोजी स्टेशन रोड रस्त्यावरील साईबाबा तपोभूमी महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट च्या गाळ मधील श्रीराम मोटर्स नावाची पाच लाख रुपयांच्या तांब्याच्या तारा ची चोरी झाली होती पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केले आहेत मात्र त्यांची उकल अद्यापही झालेली नाही कोरोना काळामुळे लोकांचे धंदे पाणी बंद आहे लोकांना काम धंदे नाहीत त्यामुळे भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे शहरात संमेक नगर परिसरात काही दुकानांचे शटर वाकून चोरीचा प्रयत्न झाल्याचे कळते छोट्या मोठ्या चोर्‍या शहरात मात्र अवैध धंदे मटका मुंबई कल्याण मटका अवैध धंदे बोकाळले आहेत धंदे मात्र मोकाट सर्रासपणे सुरू आहेत पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात थातुरमातुर कारवाई पोलीस करतात त्यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.कुणाल बाविस्कर यांचेही घर फोडून सोने-नाणे ऐवज रोख रक्कम चोरीस गेली होती शहरात विजेचा खेळखंडोबा दररोज सुरू असून लाईटची सतत ये-जा सुरू असते तर नगरपालिकेचे स्ट्रीट लाईट बहुतांशी रात्री बंद असतात तर दिवसा चालू असतात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढ व्हावी झालेल्या चोरांचा तपास लावा म्हणून नागरिकांतून मागणी होत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page