आ. काळेमुळे कोकमठाण योजनेसाठी पाणी उचलण्याचा मार्ग मोकळा

आ. काळेमुळे कोकमठाण योजनेसाठी पाणी उचलण्याचा मार्ग मोकळा

Come on. MLA Kale opens the way for the Kokmathan project to draw water

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Thu 29July 9:15

कोपरगाव : मोठी लोकसंख्या व अनेक वाड्यावस्त्या असलेल्या कोकमठाण गावाच्या पाणीपुरवठा योजनेच्या तलावात आवर्तनावेळी गोदावरी कालव्यातून पाणी उचलण्याची मोठी अडचण आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून कायमची मार्गी लागली असून नुकतेच त्यांच्या हस्ते पाणी सोडून योजनेचे लोकार्पण करण्यात आले आहे.

  आ,. आशुतोष काळे यांनी जलसंपदा विभागाकडून  पाईपलाईन व चेंबरचे काम पूर्ण करून घेतल्याने तळ्यात पाणी घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी कायमस्वरूपी संपुष्टात आल्या असून .

फोटो ओळ – कोकमठाणच्या पाणीपुरवठा योजनेच्या लोकार्पणप्रसंगी नवीन तळ्यामध्ये पाणी सोडतांना आमदार आशुतोष काळे.

या नवीन तळ्यात पाणी आ. काळे यांच्या हस्ते पाणी सोडण्यात आले. आ. काळे म्हणाले, पाणीपुरवठा योजना सुरु होण्यापूर्वी अपेक्षित असलेले नळजोड योजना सुरू झाल्यानंतर जोडले जात नाही तसेच सर्वच नळजोडधारक पाणीपट्टी देखील वेळेवर भरीत नाही त्यामुळे पाणीपुरवठा योजना चालवितांना ग्रामपंचायतीना तारेवरची कसरत करावी लागते व योजनेची दुरुस्ती करतांना देखील अनेक आर्थिक समस्या निर्माण होतात. त्यामुळे पाणीयोजना सुरु झाल्यानंतर सर्वच वाडीवस्तीवरील नागरिकांना या पाणी योजनेचा लाभ देऊन ग्रामपंचायतींनी पाणीपट्टी वसुलीची काळजी घ्यावी. या योजनेचे जे काही कामे अपूर्ण आहेत ती कामे तातडीने पूर्ण करून त्यानंतर हि योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करावी अशा सूचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. कोकमठाण व परिसरातील अनेक रस्त्यांची कामे केली आहेत व यापुढे देखील उर्वरित रस्त्यांसाठी निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सभापती सौ.पोर्णिमा जगधने, उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, रोहिदास होन, ग्रामपंचायत सदस्य संजय दंडवते, आदीसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्तविक  सुधाकर रोहोम यांनी तर सूत्रसंचालन जालिंदर हाडोळे यांनी केले. आभार ग्रामसेवक डी.बी. गायकवाड यांनी मानले, यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. 

Leave a Reply

You cannot copy content of this page