कोपरगाव ते पंढरपूर अशा अनोख्या सायकलवारीचे प्रस्थान
Departure from Kopargaon to Pandharpur Cycle Wari
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Thu 29July 19:50
कोपरगाव : गुरुवारी सकाळी सहा वाजता साई तपोभूमी चौकातील साईबाबांचे दर्शन घेऊन पांडुरंगाच्या दर्शनाकरिता कोपरगाव ते पंढरपूर अशा अनोख्या सायकल प्रवासाची सायकलवारीने तहसीलदार योगेश चंद्रे यांनी झेंडा दाखविल्यानंतर प्रस्थान झाले. या वारीमध्ये दोन पोलीस निरीक्षकासह सुमारे २५ हून अधिक सायकल वारकरी सहभागी झाले आहेत.
पर्यावरणरक्षणाच्या दृष्टिने प्रदूषणमुक्त प्रवास म्हणून सायकल हा एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळेच सायकल प्रवासाचा अधिकाधिक प्रचार-प्रसार करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूर वारीच्या निमित्ताने कोपरगाव ते पंढरपूर अशा अनोख्या सायकल प्रवासाची सायकल वारी आयोजित करण्यात आली आहे.
यावेळी संजिवनी फाउंडेशनचे सचिव सुमित कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते संजय काळे, दत्तूनाना कोल्हे, रवींद्र पाठक, माजी सभापती सुनील देवकर, बाळासाहेब आढाव, सरपंच भीमा संवत्सरकर, आदीसह नागरिक उपस्थित होते.
कोपरगाव सायकलिंग ग्रुपचे पंढरपूर वारीचे हे पहिलेच वर्ष असून या सायकल वारीत २५ ते ३० जणांनी सहभाग नोंदविला. या सायकल रॅलीत पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव , पो.नि. हर्षवर्धन गवळी, विजयराव आढाव पराग संधान, प्रशांत होन, प्रसाद नाईक, विवेक खांडेकर, संदीप देवकर, संदीप शिरोडे, बापूसाहेब सुरळकर, दिनेश कोल्हे, संतोष पवार, नितीन त्रिभुवन, केशवराव होन, प्रशांत शहाणे, कैलास शेळके, भास्कर सुरळकर, मनोज आहेर, प्रशांत निकुंभ, अनिल मुसमाडे, उमेश लोंढे, उमेश गोसावी, दिपक सुपेकर, राजेंद्र सालके, सुशांत खैरे, बाळासाहेब निकोले, राजेंद्र निकम, कैलास भैरट, प्रशांत सुरळकर आदीसह इतर युवकांचा या सायकल रॅलीत सहभाग होता.
कोपरगाव शहरातून अशाप्रकारे प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात सायकलवारी निघत आहे. २५ हून अधिक सायकलस्वार ही आतापर्यंतची ऐतिहासिक गोष्ट आहे. पंढरपूरला वारीबरोबर वेळेअभावी चालत जाणे शक्य नसले तरी कोणत्याही प्रकारचे प्रदूषण न करता सायकलने पंढरपूरला जाणेचा सायकल वारकर्यांचा हा प्रयोग संपूर्ण महाराष्ट्राची किंबहुना देशाचे आकर्षण होणार आहे.
असा असेल प्रवास
कोपरगाव ते पंढरपूर या ३१० किमी सायकलवारीचा मार्ग खालीलप्रमाणे असणार असून सायकलिस्ट दररोज १०० किमी अंतर पार करणार आहेत.
गुरूवारी २९ जुलै २०२१ (पहिला दिवस) सकाळी ६ वाजता प्रस्थान
मार्ग – शिर्डी पहिला थांबा असेल तेथे चहा व नाश्ता होईल व पुढील प्रवास होईल. – कोल्हार दुसरा थांबा असेल तेथे चहा व नाश्ता होईल व पुढील प्रवास होईल – राहुरी – नगर तिसरा थांबा असेल तेथे चहा व नाश्ता
सायकल क्लब तर्फे – पुढील प्रवास होईल. सायकलिस्ट सायंकाळी ५.०० वाजता करमाळा रोड येथे मुक्कामी पोहचली.
शुक्रवारी ३० जुलै २०२१ (दुसरा दिवस) सकाळी ६ वाजता प्रस्थान मिरजगाव- घोगरगाव-मिरजगाव -करमाळा मुक्कामी राहणार,
शनिवारी ३१ जुलै २०२१ (तिसरा दिवस) सकाळी ६ वाजता प्रस्थान- टेंभूणी, परिते, करकंब, पंढरपूर मुक्कामी,
रविवारी १ ऑगस्ट २०२१ ( चौथा दिवस) सर्व सायकलिस्ट पहाटे विठुरायाचे दर्शन घेवून बसने कोपरगाव कडे परतीचा प्रवास करतील अशी माहिती सायकलिस्ट अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान यांनी दिली.
या सायकलवारीबद्दल माहिती देताना सायकलिस्ट पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव म्हणाले,वारीचा मुख्य उद्देश इंधनरहित वाहनांचा म्हणजेच सायकलचा जास्तीत जास्त वापर करून पर्यावरण संतुलन राखणे तसेच सायकल चालविणे मानवी आरोग्यास उपयुक्त असल्याने नागरिकांनी सायकलचा जास्तीत जास्त वापर करावा असा प्रचार करणार आहेत.
दीड दोन वर्षापासून सातत्याने दररोज १० किलोमीटर तर दर रविवारी ४० ते ४५ किलोमीटर सायकलिंग चालविण्याचा सराव आम्ही करत होतो, त्यातूनच ही कल्पना पुढे आली कोपरगाव पंढरपूर सायकल वारीची कल्पना पुढे आली अशी माहिती विजय आढाव यांनी दिली.
पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी म्हणाले, सायकल चालविल्यामुळले सायकल चालविणा-या व्यक्तीचे आरोग्य चांगले राहून पर्यावरण संरक्षण देखील होणार आहे.