ठोळे उद्योग समूहाकडुन पुरग्रस्तांसाठी ५१ हजार रूपये
Rs. 51,000 for flood victims from Thole Udyog Group
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Thu 29July 20:50
कोपरगाव: सामाजिक सेवाभावी कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या येथील ठोळे उद्योग समूहाची पुरग्रसतांसाठी ५१ हजार रुपयांची मदत शहर पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचेकडे सुपूर्द केली आहे.
पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत रत्नागिरी चिपळूण येथे आलेल्या महाभयंकर महापुरात अनेक संसार प्रपंच वाहून गेले प्रचंड हानी झाली पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत गरजेची आहे ती जाणीव संवेदनशील मनाने जाणून ठोळे उद्योग समूहाचे राजेश ठोळे यांनी एकावन्न हजार रुपये मदतीचा धनादेश पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचेकडे सुपूर्द केला.
कोपरगावकरांवर ज्या ज्या वेळी मोठी आपत्ती संकटे येतात त्या त्या वेळी कोणतीही प्रसिद्धी न करता सढळ हाताने येथील ठोळे उद्योग समूह व सोना पॉली प्लास्ट प्रायव्हेट लिमिटेड च्या वतीने मोठी आर्थिक मदत करीत असतात, याआधीही ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत रॅपिड टेस्ट किट साठी उद्योग समूहाचे संचालक व उद्योजक कैलास चंद्र ठोळे व राजेश ठोळे यांनी ५१ हजार रुपये मदतीचा धनादेश तहसीलदार योगेश चंद्रे यांचेकडे सुपूर्त केला होता.
गतवर्षीही ज्यावेळी कोरोना आला होता त्यावेळीही ग्रामीण रुग्णालयाला 51 हजार रुपयांची टेस्टिंग मशीन किट पी पी ई कीट औषध गोळ्या आदी वस्तू डॉक्टर फुलसुंदर यांच्याकडे सुपूर्त केले होते .ठोळे उद्योग समूहाची नेहमीच आर्थिक मदत नेहमीच केली जाते त्यांनी मागील वर्षी एम एस जी एम महाविद्यालयात सुरू केलेल्या कोरोना सेंटरमध्ये दोनशे ते अडीचशे रुग्णांना दररोज तीन महिने जेवन पुरवले होते. तसेच लॉक डाउन काळात राज्यातील परराज्यातील नागरिक पाई परतत असलेल्यांना त्यांना ठोळे उद्योग समूह तसेच अरविंद भन्साळी कांतीलाल अग्रवाल रवींद्र ठोळे वाल्मीक कातकडे आदींच्या सहकार्याने हजारो नागरिकांना जेवण नाष्टा पाणी देण्याची सोयही आठवडाभर केली होती. महापुराचे संकट ज्यावेळी आले होते त्यावेळी पूरग्रस्तांना किट चे वाटप त्यांनी केले होत गोरगरिबांना मदत करणे हे त्यांचे कायम दातृत्व आहे दानशूर म्हणून त्यांची ओळख आहे
चौकट
स्वर्गीय भागचंद भाऊ ठोळे हे उद्योगपती कैलास शेठ ठोळे यांचे वडील होते ते ही नेहमीच गोरगरिबांच्या मदतीला धावून जात असत त्यांनी उभा केलेला ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आजही कार्यरत आहे. त्या माध्यमातूनही विविध गरजूंना मदत करण्यात येते वडिलांची परंपरा आम्ही ठोळे कुटुंबीयांनी आजही कोणतीही प्रसिद्धी न करता सुरू ठेवली आहे. जगभरात कोरोना ने थैमान घातले आहे भारतावरील कोरोणाचे हे संकट साईबाबांनी लवकरात लवकर परतून लावावे अशी मनोमन इच्छा व्यक्त करून भारत देश यातुन मुक्त व्हावा म्हणून त्यांनी प्रार्थना केली.
Post Views:
318