संजीवनी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे युएसओच्या  स्पर्धेत  यश -सौ. मनाली कोल्हे

संजीवनी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे युएसओच्या  स्पर्धेत  यश -सौ. मनाली कोल्हे

Sanjiwani Academy students succeed in USO competition – Mrs. Manali Kohle

 ‘जलसंधारण व पाण्याच्या शाश्वत  वापरा’ चे महत्व The importance of water conservation and sustainable use of water

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Mon 2August 16:10

कोपरगांव: युनायटेड स्कूल्स आर्गनायझेशन ऑफ  इंडिया (युएसओ), नवी दिल्ली व   युनेस्कोच्या सहकार्याने राष्ट्रीय  पातळीवरील  ‘एचटूओ वाटरवाईज प्रोग्राम फाॅर चिल्ड्रन ऑफ  इंडिया’ या जलसंधारण आणि पाण्याचा शाश्वत  वापर या संकल्पनेशी  निगडीत स्पर्धेत संजीवनी अकॅडमीच्या चार विद्यार्थ्यांनी  नेत्र दिपक यश  संपादन करून शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवल्याचे गौरवोद्गार  संजीवनी अकॅडमीच्या संचालिका सौ. मनाली अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

              सौ. कोल्हे म्हणाल्या की,  ‘एचटूओ वाटरवाईज प्रोग्राम फाॅर चिल्ड्रन ऑफ  इंडिया’ ही स्पर्धा ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी  होती. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना  भारतातील वाढत्या पाण्याच्या संकटाच्या संदर्भात कथा कल्पना आणि व्यंगचित्रे युएसओच्या संकेतस्थळावर पाठवायची होती.  पाणी प्रश्नाचा  अभ्यास करून संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी  आपल्या कल्पना, व्यंगचित्रे पाठवुन अंतिम फेरीत ऑनलाईन  पध्दतीने विचारलेल्या सर्व प्रश्नांची  समर्पक उत्तरेही दिली. यात इ.७ वी च्या सिध्दी संजय जोर्वेकर, अर्णव नितिन रोहमारे व इ. ५ वी च्या सुयोग गजानन चौधरी , ईश्वरी  सतिश इंगळे यांनी नेत्रदिपक यश  संपादन केले.

युनायटेड नेशन्सची १९४८ साली स्थापन झालेली संस्था आहे. या संस्थेचे कार्य दक्षिण आणि मध्य आशियायी  मधिल ११ देशात  चालते. यात भारताचाही समावेश  आहे. या संस्थेच्या सहकार्याने युएसओ मार्फत भारतात कार्य केल्या जाते. या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेेत देशातील ४३ शाळांमधील १७००० विद्यार्थ्यांनी  सहभाग नोंदविला. यात संजीवनी अकॅडमीच्या चार विद्यार्थ्यांचा समावेश होता .

या विद्यार्थ्यांचे माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  संस्थापक अध्यक्ष शंकरराव  कोल्हे, कार्याध्यक्ष नितीनराव कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे  अभिनंदन केले. तर सौ. मनाली कोल्हे यांनी छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी प्राचार्या सौ. सुंदरी सुब्रमण्यम, हेड मिस्ट्रेस माला मोरे, उपप्राचार्य विलास बागडे, मार्गदर्शक  बालाराम साहु, स्कूल कॅप्टन आदिती बानेश  गायकवाड व माणसी विजय नरोडे उपस्थित होते.       

Leave a Reply

You cannot copy content of this page