आमदार काळेकडून ३ कोटीच्या चासनळी आरोग्य केंद्राच्या कामाची पाहणी
ग्रामस्थांचे आरोग्य आणि गावच्या वैभवात भर घालणार – आ.काळे
कोपरगाव :
चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राची कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी पाहणी केली. पंचायत समितीचे उपअभियंता उत्तम पवार, श्री. दिघे व ठेकेदार त्यांच्याबरोबर आरोग्य केंद्राच्या सुरू असलेल्या कामाबाबत चर्चा केली. तीन कोटीची ही इमारत ग्रामस्थांचे आरोग्य आणि गावच्या वैभवात भर घालणारी असे मत आमदार काळे यांनी यावेळी व्यक्त केले.
याप्रसंगी सभापती सौ. पौर्णिमा जगधने, झेडपी सदस्य सुधाकर दंडवते, संचालक सचिन चांदगुडे, भास्कर चांदगुडे, सोमनाथ चांदगुडे, दिलीप चांदगुडे, डॉ.मच्छिन्द्र बर्डे, सुभाष गाडे, अनिल चांदगुडे, प्रभाकर चांदगुडे, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, उपअभियंता उत्तम पवार, श्री. दिघे. वैद्यकीय अधिकारी विकास आढाव, कॉन्ट्रॅक्टर राहुल चांदगुडे आदी उपस्थित होते.
जुन्या चासनळी आरोग्य केंद्राची दुरवस्था लक्षात घेऊन आमदार काळे यांनी नवीन इमारत बांधण्यासाठी झेडपी कडून तीन कोटीचा निधी मिळविला.या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
चासनळी येथील आरोग्य केंद्रात दररोज दीड-दोनशे ओपीडी असल्याने पंचक्रोशीतील लोकांसाठी हे आरोग्य केंद्र प्राथमिक उपचाराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असून इमारतीची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांना उपचारासाठी गैरसोय होत होती. याची दखल घेवून आमदार काळे यांनी मिळविलेल्या झेडपीच्या निधीतील चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अत्याधुनिक इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. काम पूर्ण होताच ही वास्तू पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या आरोग्याबरोबरच चासनळी गावच्या वैभवात भर टाकणारी ठरणार असल्याचा मत आमदार काळे यांनी व्यक्त केले. या इमारतीचे कामासाठी झेडपी सदस्य सुधाकर दंडवते यांनी पाठपुरावा केला आहे.
कोरोना व साथीचे आजार यात नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे, यासाठी समक्ष जावून पाहणी करून आमदार काळे यांनी आढावा घेतला. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ईमारतीचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी पंचायत समिती बांधकाम अभियंते व ठेकेदार यांना दिल्या .
Post Views:
416