अल्पवयीन मुलीला फूस लावून अज्ञाताने पळवले, गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीला फूस लावून अज्ञाताने पळवले, गुन्हा दाखल

वत्तृवेध ऑनलाईन

कोपरगाव

कोपरगाव तालूक्यातील मौजे इंदिरा नगर टाकळी येथील १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताराबाई साळवे (६५) यांना एक १६ वर्षाची नात आहे. इयत्ता नववी पर्यंत शिकून तिने शाळा सोडून दिलेली असून, ती घरीच राहते. मात्र मंगळवारी (७ जुलै) रोजी सायंकाळी ७ वाजता अंगावरील कपड्यानिशी कोठेतरी निघून गेली आहे. मी आपल्या नातीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ती सापडली नाही. अखेर मी ताराबाईने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अल्पवयीन मुलीला पळवण्याचा गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे.कॉ. डी.आर. तिकोणे आणि तपास करीत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page