दिव्यागांच्या मदत व अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध – आ. आशुतोष काळे
Committed to help Divyag and solve problems -MLA. Ashutosh Kale
कोपरगाव: मला निवडून देण्यात दिव्यांग बंधू-भगिनींचा देखील समावेश असून त्यांच्या मदतीसाठी व अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आ. आशुतोष काळे दिव्यांग बंधू-भगिनींना अपंगत्वाचे शासकीय प्रमाणपत्र वाटप प्रसंगी दिली.
आ. आशुतोष काळे म्हणाले की, दिव्यांग बंधू-भगिनींना दैनंदिन जीवनात अनंत अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांना शासकीय प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक आहे. त्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणे सहज शक्य होते. त्यांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळवून देवून त्यांचे जीवन सुखकर व्हावे यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच मतदार संघातील ज्या दिव्यांग बंधू-भगिनींना अपंगत्वाचे शासकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी कोपरगाव येथे येण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी वाहनाची मोफत व्यवस्था करणार असल्याचे त्यांनी यावेळी संगितले.
याप्रसंगी केएसके कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, एम. जी. ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, पंचायत समिती सदस्य अनिल कदम, दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल, सुनील फंड, मनसेचे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड आदींसह दिव्यांग बंधू-भगिनी उपस्थित होते.





