२८ कामांना स्थगिती मिळवून कोपरगावकरांची पूर्ण जिरवली; आता मिठ चोळू नका – विरेन बोरावके

२८ कामांना स्थगिती मिळवून कोपरगावकरांची पूर्ण जिरवली; आता मिठ चोळू नका – विरेन बोरावके

Kopargaon residents were given full reinstatement by getting postponement of 28 works; Now don’t rub salt – Viren Boravake

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Fir 6 August 21:00

 कोपरगाव : नगराध्यक्षपदी झालेला पराभव विसरता न आल्यामुळे २८ कामांना स्थगिती मिळवून कोपरगावकरांची पूर्ण जिरविली आहे. आता मिश्कील टिप्पण्या करून शहरवासीयांच्या जखमेवर मीठ चोळू नका, असा सल्ला नगरसेवक विरेन बोरावके यांनी विवेक कोल्हे यांनी केलेल्या कोपरगावकरांची जिरवु नका मिश्कील टिप्पणीवर दिला.

बोरावके पुढे असे म्हटले आहे की, कोल्हेंना कोपरगावच्या विकासाशी देणघेण नाही. दर सहा महिन्याला खांदेपालट करायचा आणि कार्यकर्ते खुष ठेवायचे एवढेच त्यांनी मागील पाच वर्षात केले आहे. त्यांना विकासाशी चाड असती तर पाच नंबर साठवण तलाव मागील पाच वर्षात सहज झाला असता कारण त्यांच्या पक्षाचे राज्यात व केंद्रात सरकार होते. मात्र नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासठी विकास न होवू देण्याचा विडा उचलेल्या कोल्हे यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या बहुमताचा व राज्यातील सत्तेचा फायदा त्यांनी विकासासाठी न करता शहराचा विकासनिधी दुसरीकडे वळवून शहरवासियांना विकासापासून वंचित ठेवून बदला घेतला. मात्र त्याची किंमत देखील त्यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मोजावी लागली. त्यामुळे सुडाने पेटून उठलेले कोल्हे कुटुंबाला ज्या ज्यावेळी शहरातील जनतेवर सूड उगवायच्या संधी मिळाल्या त्या एकही संधी कोल्हेंनी सोडल्या नाहीत. जिरवा जीरवीची भाषा करणाऱ्यांनी चार नंबर साठवण तलावाच्या कामाला  व  पाच नंबर साठवण तलावाच्या कामात  खोडा घालून शहरातील जनतेची जिरवली. त्याचबरोबर शहराचे क्रीडा संकुल पळविले, ज्या स्विमिंग टँकवर शहरातील एकही नागरिक जात नाही त्या स्विमिंग टँकवर पैशाची उधळपट्टी करून जनतेची जिरवली व  जाता जाता २८ विकासकामांना स्थगिती मिळवून पुन्हा एकदा शहरातील जनतेची जिरवून त्यांनी स्वत:ची मनशांती करून घेतली. त्यांनी पाच वर्ष जनतेची जिरवण्यातच वाया घातली असतांना त्यांचे युवराज आजही जिरवा देवीच्या टिपण्या करून मीठ चोळण्याचे काम करीत असल्याची टीकाही बोरावके यांनी केली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page