अतिक्रमण काढण्यासाठी केलेले उपोषण अंगलट; स्वतःचेच अतिक्रमण काढण्याची नामुष्की

अतिक्रमण काढण्यासाठी केलेले उपोषण अंगलट; स्वतःचेच अतिक्रमण काढण्याची नामुष्की

Fasting anklets made to remove encroachments; The disgrace of removing one’s own encroachment

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Fir 6 August 20:50

 कोपरगाव :आपल्या शेजाऱ्याने अतिक्रमण केले असून ग्रामपंचायतीने त्याचे अतिक्रमण काढावे यासाठी उपोषणास बसलेल्या उपोषणार्थीचे उपोषणा अंगलट आले असून स्वतःचे आक्रमण काढण्याची नामुष्की त्यांच्यावर आली असल्याची घटना माहेगाव देशमुख गावात घडली आहे.

गट नंबर १९ मधील जागेत नवनाथ पांडुरंग वाघ यांचे घरकुल आहे. शेजारी असलेल्या अर्जुन सखाराम माळी यांनी घरासमोर अतिक्रमण केल्यामुळे येण्या-जाण्यासाठी मला रस्ता नसल्याने मी गाय दान केली असल्याचा दावा उपोषण कर्ताने केला होता . ग्रामपंचायतीने उपोषणकर्ते वाघ व माळी यांना नोटीस बजावली होती. मात्र उतावीळ झालेल्या नवनाथ पांडुरंग वाघ यांनी आपले शेजारी अर्जुन माळी यांनी अतिक्रमण केले असून ग्रामपंचायतीने त्यांचे अतिक्रमण काढावे यासाठी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय समोर कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. दोन्ही बाजूची परिस्थिती ऐकून घेत ग्रामपंचायतीचे सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे यांनी पंचकमिटीला पाचारण केले. व जागेची मोजणी करण्याचे निश्चित केले.अर्जुन माळी घराच्या समोरील बखळ जागेचे मोजमाप केले असता उपोषणार्थी नवनाथ वाघ यांचे स्वतःचेच २७ बाय ११ फुटाचे अतिक्रमण असल्याचे आढळून आल्याने त्यांना आपण अतिक्रमण काढून घेणार असल्याचे लेखी पंचासमोर द्यावे लागले आहे . हे म्हणजे हात दाखवून अवलक्षण अशी प्रतिक्रिया माहेगाव करांमध्ये उमटत आहे यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राधाकिसन काळे, पंचायत समितीचे उपसभापती अर्जुन काळे, रविंद्र काळे, उत्तम महाराज लांडगे, उपसरपंच बाळासाहेब पानगव्हाणे,पी. आर. काळे, ग्राम विकास अधिकारी गोरक्षनाथ शेळके, माजी सरपंच बापूसाहेब जाधव, विकास रणसिंग गणेश पानगव्हाणे,भागवत पानगव्हाणे, उत्तमराव पानगव्हाणे, मच्छिंद्र गावित्रे, भिमराज रोकडे, भिकन सय्यद, गणेश रोकडे, संजय उगले, मारूती धोत्रे,बबन भिरोडे आदी उपस्थित होते.

याबाबत सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे यांनी पंचा समोर अतिक्रमणाच्या बाबतीत जागेची मोजणी झाली असून दोन दिवसात अतिक्रमण काढून देण्याचे वाघ यांनी मान्य केले असून तसे लेखी पत्र त्यांनी ग्रामपंचायतीला दिले असल्याची माहिती दिली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page