कु-हाड मारल्याने जखमी झालेल्याचा वृद्धाचा मृत्यू ; तिघांवर गुन्हा दाखल

कु-हाड मारल्याने जखमी झालेल्याचा वृद्धाचा मृत्यू ; तिघांवर गुन्हा दाखल

The death of an old man injured by a bruise; Charges filed against three

कोपरगाव : सामायिक विहिरीच्या पाईप लाईन चे झाकण काढण्यावरून तिघांनी कुर्‍हाडीने मारहाण केली होती. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्या वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आरोपींविरोधात  कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला .

याबाबत अधिक माहिती अशी की, मयत भारम हिवलदार भोसले हे २० जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता सामाईक विहीरीवर पाईपलाईन चे झाकण काढण्यासाठी गेले असता यातील आरोपी भागवत भारम भोसले,कृष्णा भागवत भोसले जिगर भागवत भोसले रा. पढेगाव मजकुर यांनी फिर्यादीचे पती भारम भोसले यास जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर कु-हाडीने मारून गंभीर जखमी केले तसेच मुलगा भिवसेन च्या हातावर कु-हाडीने मारून फिर्यादीस पायावर मारहाण केली होती. या मारहाणीत भारम हिवलदार भोसले हे गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना कोपरगाव शहरातील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु त्यांची परिस्थिती खालावल्याने त्यांना शिर्डी सुपर स्पेशलिटी रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र गंभीर इजा झाल्याने उपचारादरम्यान गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी (२०जुलै ) भारम भोसले यांची पत्नी कारसबाई भारम भोसले यांनी मारहाण केल्याप्रकरणी फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला होता. मात्र यांचा भारम भोसले उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आरोपींविरोधात ३०२ कलम वाढवून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा भागवत भोसले याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव हे करीत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page