संजीवनी बीबीए-आयबीच्या १० विद्यार्थ्यांची ओम लाॅजिस्टीक मध्ये निवड – अमित कोल्हे
10 students of Sanjeevani BBA-IB selected in Om Logistics – Amit Kolhe
बीबीए-आयबी विभागाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे यश Success of BBA-IB Training and Placement Department
कोपरगांवः संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलीत संजीवनी सिनिअर काॅलेजच्या अंतर्गत पुणे विद्यापीठ संलग्न बॅचलर ऑफ बिझीनेस अडमिस्ट्रेशन -इंटरनॅशनल बिझीनेस (बीबीए-आयबी) हा पदवी अभ्याक्रम इ. १२ वी नंतर ३ वर्षे शिकविला जातो. या अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील ओम लाॅजिस्टीक लिमिटेड, पुणे या दळणवळणाच्या क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत १० विद्यार्थ्यांची आकर्षक पगारावर नोकरीसाठी निवड केली आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
श्री कोल्हे यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की आज कोणतेही शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक तरूण-तरूणीला आपल्याला चांगली नोकरी मिळावी, अशी प्रबळ इच्छा शक्ती असते. पालकांना सुध्दा आपला पाल्य आपल्या डोळ्या समोर स्थिर स्थावर व्हावा ही इच्छा असते. मात्र या स्पर्धेच्या काळात नोकऱ्या मिळणे अवघड होत आहे. परंतु, संजीवनीच्या सर्वच विद्या शाखांमध्ये मध्ये प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विध्यार्थ्याला नोकरी मिळालीच पाहीजे, या पालकत्वाच्या भुमिकेतुन संजीवनीचे व्यवस्थापन विध्यार्थ्यांना सक्षम करीत असते. यामुळे संजीवनीच्या विविध विद्याशाखांमधिल अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या कंपन्यांच्या कसोट्याांना सामोरे जावुन नोकऱ्यांच्या संधी मिळवित आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ओम सदाशिव साळवे, अमित आबासहेब जाणकार, उत्कर्ष सुनिल राजुळे, जालिंदर तुकाराम आहेर, निखिल नरेश सांगळे, प्रतिक राहुल जोशी , सौरभ अशोक चौधरी , जयेश अर्जुन मोरे, रोनित भरत पाटणी व अभिषेक दिवटे यांचा समावेश आहे. पत्रकात श्री कोल्हे पुढे म्हणाले की सृजनशिलता व संशोधन वृत्तीचे संवर्धन हे ज्ञान संपादनाचे मुळ उद्धिष्ट संजीवनीने जोपासले आहे. आधुनिक ज्ञानकोशाचा वापर शिक्षकांकडून अवलंबविल्या जात असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण केल्या जाते. संजीवनीच्या शिक्षण पध्दतीनुसार जिज्ञासेचे ज्ञानात रूपांतर होते. केवळ पुस्तकी शिक्षण दिल्याने विद्यार्थी परीक्षार्थी होवुन चांगले गुण मिळवु शकतात परंतु चांगला गुण मिळविणारा विद्यार्थी चांगला ज्ञानार्थी होईलच याची खात्री नसते. म्हणुन विद्यार्थी गुणार्थी तर असावाच पण जगातील महाकाय स्पर्धेत खंबिरपणे सक्षम करण्यासाठी त्याला सर्व अंगाने ज्ञानार्थी बनविणे गरजेचे आहे. या सर्व बाबींचा संजीवनी मध्ये अवलंब केल्या जात असल्यामुळे मोठ्या संख्येने विध्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवुन ते स्वावलंबी होत आहे, असे श्री. कोल्हे शेवटी म्हणाले. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष श्री. शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष श्री. नितिनराव कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री. अमित कोल्हे व विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व प्राचार्य डाॅ. एस.बी. दहिकर आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. निलेश भालेराव यांचे अभिनंदन केले.