नगर जिल्हा बँक असोसिएशनकडुन सत्येन मुंदडा यांचा सत्कार

नगर जिल्हा बँक असोसिएशनकडुन सत्येन मुंदडा यांचा सत्कार

Satyen Mundada felicitated by Nagar District Bank Association

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Sun 8 August 12:20

कोपरगाव :अहमदनगर जिल्हा बँक असोसिएशन नगर येथे शनिवारी (७ऑगस्ट) रोजी शहर सहकारी बँकेच्या प्रा. मुकुंद घैसास सभागृहात पिपल्स बँकेचे चेअरमन सत्येन मुंदडा यांचा सत्कार अध्यक्ष सीए गिरीश घैसास यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी गिरीश घैसास यांच्या अध्यक्षतेखालील सभेमध्ये नवीन बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट , रिझर्व बँकेचे नवीन सर्क्युलर, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट , नोकर भरती, मॅनेजिंग डायरेक्टर व पूर्णवेळ संचालक इत्यादी विविध विषयावर चर्चा झाली. उपाध्यक्ष नाथाभाऊ राऊत यांनी आभार मानले.

सदर या कार्यक्रमाला राज्य बँक फेडरेशनच्या संचालिका सौ.मेधा काळे, अंबिका महीला बँकेच्या चेअरमन सौ आशा मिस्कील, अहमदनगर मर्चंट बँकेचे माजी चेअरमन संजय गांधी , शहर सहकारी बँकेचे चेअरमन गिरीश घैसास, कोपरगाव पिपल्स बँकेचे माजी चेअरमन सुनील कंगले , पारनेर बँकेचे शिवाजीराव व्यवहारे , भिंगार अर्बन बँकेचे नाथा राऊत, ऑडिटर पटणी व इतर संचालक उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page