समाज उन्नतीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य प्रेरणादायी- विवेक कोल्हे.

समाज उन्नतीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य प्रेरणादायी- विवेक कोल्हे.

.Dr. for the upliftment of society. Babasaheb Ambedkar’s work is inspiring – Vivek Kolhe.

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lWed11 August 20:10

कोपरगाव : संघर्ष, क्षमा, शीलता यातून सर्वसमावेशक प्रगती साधावी, शिक्षणातून समाज उन्नतीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँक संचालक विवेक कोल्हे यांनी जेऊर कुंभारी संजयनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मैदानावर (आठवले गट) प्रेणित भीम साम्राज्य सेना संघटनेच्या उद्घाटन प्रसंगी केले.

रिपाई प्रदेश सचिव दीपक गायकवाड यांनी प्रास्ताविकात आजवर कोल्हे कुटुंबियांनी केलेल्या विकासकामांची माहिती देत संघटना स्थापनेचा विचार मांडला. 

या याप्रसंगी राज्य संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव,  मार्गदर्शक बाबुराव काकडे, माजी संचालक बाळासाहेब वक्ते, माजी सभापती शिवाजीराव वक्ते,आनंदराव चव्हाण,  सरपंच सुवर्णा पवार, उपसरपंच जालिंदर चव्हाण, भायुमो उपाध्यक्ष सुधाकर वक्ते,शिर्डी शहराध्यक्ष कैलासराव शेजवळ, जिल्हा अध्यक्ष   पप्पू भाऊ बनसोडे, नगरसेवक  तालुका अध्यक्ष   नानाभाऊ त्रिभुवन,  संतोष होणे, रमेश गायकवाड , देवराम पगारे,  शब्बीर भाई सय्यद ,रविभाऊ शेजवळ, वहाळ   विजय काकडे , सचिन वाघमारे सुमित वाघमारे आदी उपस्थित होते . विवेक कोल्हे यांच्या हस्ते नवनिर्वाचित भाजपा युवा मोर्चाचे  तालुका उपाध्यक्ष सुधाकर वक्ते यांचा सत्कार करण्यात आला.              

    विवेक कोल्हे पुढे म्हणाले  की, भिम साम्राज्य सेना ही समाज हितासाठी आहे. समाजाचे प्रश्न या संघटनेच्या माध्यमातून सोडवले जाईल समाजिक काम करत असताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास त्यात आपण स्वतः लक्ष घालून ते सोडवू.  कार्याध्यक्ष सुमित पगारे, शाखा अध्यक्ष सागर  गायकवाड यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  सर्व  कार्यकर्ते आदी संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेच्या सर्व युवा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

You cannot copy content of this page