कोपरगांवची अवस्था अंधेर नगरी चौपट राजा -स्नेहलता कोल्हे
Kopargaon’s condition Andher Nagari Chaupat Raja – Snehalta Kolhe
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lWed11 August 20:00
कोपरगांवः विधानसभा मतदार संघात वीजेचा खेळ खंडोबा झाला आहे. नादुरूस्त वीज रोहित्रे दुरूस्ती होत नाही, विहीरींना पाणी असूनही ते पिकांना देता येत नाही,ज्यांच्याकडे ही जबाबदारी आहे ते याबददल बोलायलाही तयार नाहीत.एकीकडे कोरोना चे संकट दुसरीकडे विजेची बोंब अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याची अवस्था बिकट झाली आहे. एकूण परिस्थिती पाहता कोपरगांवची अवस्था ‘अंधेर नगरी चौपट राजा’ अशी झाली असल्याची टीका भाजपा प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे. उर्वरीत ८७ गावातही अशीच अवस्था असल्याचेही त्या म्हणाल्या,
सौ. कोल्हे यांनी कोपरगांव शहर व मतदार संघातील वीजेच्या समस्यासंदर्भात तपशिलवार पत्र उर्जामंत्री नितीन राउत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्य कार्यकारी अभियंता नाशिक व कार्यकारी अभियंता संगमनेर यांना लिहीले असुन तत्कालीन उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकाळात संपुर्ण पाच वर्षे कोपरगांव मतदार संघात वीजेची कुठलीही समस्या आली नाही याउलट सुमारे २५० च्या वर वीज रोहित्रांचे अपग्रेडेशन करण्यांत आले. नविन वीज उपकेंद्रे मंजुर करून ती कार्यान्वीत करण्यांत आली, वीज आराखडा तयार करून कार्यवाही केली त्यामुळे शेतक-यासह नागरिकांना वीजेच्या प्रश्नावर कोपरगांव कार्यालयात कधीही हेलपाटे मारावे लागले नाही. वीजेच्या समस्यांचे तात्काळ निराकरण होत होते पण आता दोन वर्षापासून कोपरगांव मतदार संघात वीजेचा खेळखंडोबा झाला आहे. छोटया छोटया कामांसाठीही चकरा मारून वीजग्राहक, शेतकरी वैतागला आहे., कुठे फयुज नाही, असंख्य रोहित्र उघडयावर धोकेदायक स्थितीत असुन त्यातील इंधन चोरीला जात आहे, रोहित्र जळण्यांचे प्रमाण वाढले आहे, क्षमतेपेक्षा जादा लोड वाढल्यांने वीज खंडीत होण्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे, नवीन वीज कनेक्षन मिळण्यांबरोबरच जुन्या वीज समस्यांचा डोंगर वाढला आहे, लपटी होवुन पीके जळण्यांचे प्रमाण वाढले आहे, वीज तारा अस्ताव्यस्त झाल्या आहेत अशा एक ना अनेक समस्या वाढुनही त्याकडे कोपरगांव शहर व ग्रामिण उपअभियंते व त्यांचे जबाबदार अधिकारी सातत्यांने दुर्लक्ष करत आहे. एकीकडे पावसांने ओढ दिली तर दुसरीकडे ज्या शेतक-यांच्या विहीरींना पाणी आहे पण वीज नसल्यामुळे सोयाबीन, मका, बाजरी आदि खरीप पिके पाण्यांअभावी जळून चालली आहे., शेतक-यांवर दुहेरी संकट कोसळत असतांना उपअभियंता, कार्यकारी अभियंता यांच्याकडे शेकडोवेळा पत्रव्यवहार करूनही त्याला केराची टोपली दाखविण्यांचे काम सर्रासपणे केले जाते, वीज रोहित्र जळाले तर ते बदलुन देण्यांसाठी वीज वितरण कंपनीचे जबाबदार अधिकारी सातत्यांने अडवणुक करतात, पाच वर्शापुर्वी केलेल्या बृहत वीज आराखडयात सातत्यांने बदल केले जातात, काही ठिकाणी सापत्नपणांची वागणुक दिली जाते. कोकमठाण वीज उपकेंद्र मंजुर करून ते कार्यान्वीत करण्यांचा पाठपुरावा आपण केला पण जेउरकुंभारी डाउच खुर्द भागात कृषि पंपाची वीज ठरलेल्या वेळापत्रका नुसारही मिळत नाही त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे, याचाच अर्थ कोकमठाण वीज उपकेंद्र अद्यापही सुरू झालेले नाही अशी शंका येवु लागली आहे, संपुर्ण मतदार संघाची वीज समस्यांची दुरावस्था झाली आहे तेंव्हा उर्जामंत्री यांनी लक्ष घालुन कोपरगांवच्या वीज समस्या तात्काळ सोडवाव्या असे शेवटी सौ. कोल्हे म्हणांल्या.





