जनतेचे प्रश्न सुटले नाहीत तर खुर्चीला किंमत राहत नाही- सौ. स्नेहलता कोल्हे
If the questions of the people are not answered, then the price of the chair does not remain. Snehalta Kohle
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lWed11 August 20:30
कोपरगाव :आज मतदार संघातील पाणी, शेती, वीज, आरोग्य, आदी प्रश्न गंभीर स्वरूपाचे बनले आहेत, मतदार हैरान झाले आहेत, मात्र त्याकडे दुर्लक्ष होताना दिसते आहे. जनतेचे प्रश्न सुटले नाहीत तर खुर्चीला किंमत राहत नाही अशी खोचक टीका भाजपा प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे यांनी पुणतांबा येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी समर्थ बूथ अभियान अंतर्गत बैठकीत केली.
मतदार संघातील पुणतांबा तत्कालीन देवेंद्र फडणवीस शासनाने पुणतांबा, कोकमठाण पाणी योजनांसाठी शासन निर्णयात बदल करून शेती महामंडळाची शेत जमीन दिल्याने हे प्रश्न मार्गी लागले आहेत. पुणतांबा परिसरातील दहा गावांच्या असंख्य समस्या अनेक पंचवार्षिक निवडणुकीत वर्षानुवर्षे प्रलंबित असताना त्या सोडवून त्याला निधी मिळवत प्रश्न मार्गी लावत पुढील पंचवीस वर्षाचा विकास आराखडा तयार केला आहे. असे त्यांनी परिसरातील पुणतांबा, जळगाव, वाकडी, चितळी, शिंगवे, रामपूरवाडी, धनगरवाडी, यलमवाडी येथे बैठकीत सांगितले , भारतीय जनता पक्षाचे संघटन तळागाळात पोहोचवून ज्याप्रमाणे आपण गावगाडा सांभाळतो, त्याप्रमाणे भाजपा बूथ प्रमुखाचे कार्य हे महत्त्वाचे असून केंद्र, बूथ व शक्ती प्रमुखांनी आपापल्या भागात संपर्क करून भाजपा संघटन मजबूत करावे असेही त्या म्हणाल्या. याप्रसंगी गंगाधर चौधरी, शिवाजीराव लहारे किसनराव बोरबने, रामनाथ चौधरी सर्जेराव जाधव, भाऊसाहेब चौधरी, राजेंद्र बाभुबळके, उपसरपंच प्रशांत काळवाघे (शिंगवे), रामभाऊ बोरबने, पुणतांबा सौ. विजया बोरबने, सरपंच संदीप सुरडकर सुभाषराव सांबारे, गणीभाई शेख, बबनराव काळे, दादाभाऊ सांबारे, डॉ. अविनाश चव्हाण, पूनम बोरबने, जयवंत शिंदे, संजय शेळके, राजूनाना लहारे, संभाजीराव गमे, बाळासाहेब वाघ, विक्रम वाघ, आदी उपस्थित होते. सर्जेराव जाधव यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात यांनी समर्थ बूथ अभियान संदर्भात माहिती दिली. दादासाहेब सांबारे,शिवनाथ साळुंखे, दत्तात्रय सांबारे प्रश्न मांडले व काही मागण्या केल्या शेवटी दादासाहेब सांबारे यांनी आभार मानले.
चौकट ज्यांनी आपला विश्वासघात केला, त्यांचा आत्मघात झाला असे सौ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या.





