खोपडीच्या शेतकऱ्यांना तत्कालीन आमदार कोल्हे यांच्या पाठपुराव्याने मिळाली दोन कोटींची भरपाई.

खोपडीच्या शेतकऱ्यांना तत्कालीन आमदार कोल्हे यांच्या पाठपुराव्याने मिळाली दोन कोटींची भरपाई.

Skull farmers received compensation of Rs 2 crore following the then MLA Kolhe.

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lThu12 August 20:30

कोपरगाव :  तालुक्यातील खोपडी येथील नांदूरमधमेश्वर जलद कालव्याच्यI वितरिकेसाठी संपादित झालेल्या भूसंपादनाचे २ कोटी १७ लाख रुपये मिळाल्याबद्दल येथील असंख्य शेतकऱ्यांनी तत्कालीन आमदार व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांची कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा सत्कार केला आहे.

प्रारंभी श्री. रमेश व अशोक नवले प्रास्तविक करतांना म्हणाले की, नांदूरमध्यमेश्वर  जलद कालवा व त्याबाबतचे प्रश्न माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी जाणून घेत त्याबाबत गोदावरी खोरे पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद व तत्कालीन  जलसंपदामंत्री यांच्याकडे अनेक वेळा पाठपुरावा करत बैठका घेतल्या.  सौ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या  की, नांदूरमध्यमेश्वर  जलद कालवा वितरिका  १ व २ साठी संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून असंख्य शेतकऱ्यांनी याबाबत आपल्याकडे लेखी निवेदने दिली होती,. त्यावर विधिमंडळात प्रश्न उपस्थित करत याबाबतच्या संबंधित अधिकार्‍यांकडे व अहमदनगर-औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांकडे   प्रस्ताव दाखल केले. त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी संजीवनी उद्योग समूह  यंत्रणेने विशेष परिश्रम घेत यात दुरुस्स्ता केल्या व तत्कालीन  जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे एकरकमी प्रस्ताव दाखल केला,  त्यातून खोपडीच्या शेतकऱ्यांना २ कोटी १७ लाख रुपयांचे वाटप नुकतेच धनादेशाद्वारे झाले, भूसंपादित जमिनीचे पैसे मिळाल्याबद्दल येथील शेतकरी सर्वश्री. हौशीराम काळे, कल्याबाई नवले, कचरू जाधव, बाळासाहेब वारकर, दत्तात्रय नवले, विजय नवले, गणेश नवले, विठ्ठल नवले, शिवाजी नवले, प्रकाश नवले, तुकाराम नवले आदींनी कोल्हे यांचे विशेष आभार मानत या ऋणातून उतराई होण्यासाठी सत्कार केला व कृतज्ञता व्यक्त केली.   शेवटी अशोक नवले यांनी आभार मानले.  

Leave a Reply

You cannot copy content of this page