संजीवनी पाॅलीटेक्निकचे नोकरदार तीन शतक पार – अमित कोल्हे
Employees of Sanjeevani Polytechnic cross three centuries – Amit Kolhe संजीवनीच्या ३०३ विद्यार्थ्यांचे नोकरदार होण्याचे स्वप्न पुर्ण The dream of 303 students of Sanjeevani to become employees has come true
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir20 August 19:38
कोपरगांव: संजीवनी के. बी. पी. पाॅलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये नामांकित कंपन्यांमध्ये तब्बल ३०३ विध्यार्थ्यांना त्यांच्या अंतिम निकाला अगोदरच नोकऱ्या मिळवुन देवुन त्यांचे नोकरदार होण्याचे स्वप्न पुर्ण केले आहे. यातील जास्तीत जास्त विद्यार्थी हे ग्रामिण भागातील असुन ते वयाच्या १९ व्या वर्षीच कुटूंबाचा आधार बनले आहे, यात मुलींची संख्याही उल्लेखनिय आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्याुटस्चे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की सध्याच्या काळात अनेक बेरोजगार हातांना काम नाही तर, अनेक कामांना योग्य हात नाही. परंतु ही विषमता संजीवनी पाॅलीटेक्निकने वेळीच ओळखुन उद्योग जगताला नेमके काय तंत्रज्ञानाधिष्ठीत नवोदित अभियंते पाहीजे याचा साकल्याने विचार करून शाखा निहाय तसे अधिकचे ज्ञान दिल्याने संजीवनचे विद्यार्थी विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कसोटीत उतरले आणि म्हणुनच संजीवनी पाॅलीटेकिने ग्रामिण महाराष्ट्रात सर्वांत जास्त नोकऱ्या देणारी संस्था म्हणुन बिरूदावली प्राप्त केली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये पुढील प्रमाणे नामांकित कंपन्यांनी संजीवनीच्या विद्यार्थ्यांची निवड केली आहे. कंसातील आकडे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची . बजाज अॅटो लिमिटेड (३०), कमिन्स इंडिया प्रा. लि., (२९), मदरसन टेक्नालाॅजीस अँड इंजिनिअरींग (२७), पोराईट इंडिया लि., (६), यझाकी (६), रेनाटा प्रेसिझन काम्पोनंटस् (१०), सिग्मा इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरींग कार्पोरेशन (१३०), इन्फोसिस (२), केपीआयटी (२), फिलिप्स (२), श्नायडर इलेक्ट्रिक (१), अर्सेलर मित्तल निप्पाॅन स्टील (१), शारदा मोटर्स (१६), इपिटोम काम्पोनंटस् प्रा. लि. व एल अँड टी डीफेन्स (४). संजीवनी पाॅलीटेक्निकला मागील ३५-३६ वर्षांची यशस्वी परंपरा आहे. अनेक माजी विद्यार्थी विविध नामांकित कंपन्यांमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. त्यांनी तेथे पाळलेली उद्योग जगतातील आचार संहिता, संबंधित कंपन्यांच्या प्रगतीसाठी करीत असलेले प्रामाणिक प्रयत्न, इत्यादी बाबींमुळे संजीवनीच्या माजी विध्यार्थ्यानी उद्योग जगतात नावलौकिक प्राप्त केला आहे. याचा फायदाही सध्याच्या विध्यार्थ्यांना नोकऱ्या मिळण्यास होत आहे.
माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत तसेच वर्षभर ज्या विद्यार्थी- विद्यार्थीनीस नोकरी पाहीजे अशांमध्ये विविध पैलुंची रूजवण करण्यासाठी प्रयत्न केलेल्यां मध्ये प्राचार्य ए. आर. मिरीकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. आय. के सय्यद व सर्व विभागांचे विभाग प्रमुख यांचेही अभिनंदन केले.

Post Views:
319