गंगागिरींचा सत्संग सप्ताहाच्या माध्यमातून सर्वदूर- स्नेहलता कोल्हे.
Gangagiri’s Satsang through the week is everywhere – Snehalta Kolhe.
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir20 August 19:30
कोपरगाव : गंगागिरी महाराजांचा सत्संग सप्ताहाच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचला असून नारायणगिरी महाराजांनी सामुहिक नामस्मरण भक्तीतून वैयक्तिक भक्तीकडे जाण्याचा मार्ग दाखवला, तर महंत रामगिरी महाराज यांनी त्याची व्याप्ती वाढवून कोरोना महामारीत मनुष्याची अध्यात्मिक बांधणी करत असल्याचे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले.
जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाची गोडी सर्वसामान्यांच्यi वैचारिक विचारधारेची जडणघडण मजबूत करणारी असल्याचेही सौ. कोल्हे म्हणाल्या.
श्रीक्षेत्र सरलाबेट येथे १७४ व्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास सौ. स्नेहलता कोल्हे यांनी कोरोना नियम पाळून बुधवारी भेट दिली त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. सर्वदूर पाऊस होऊन शेतकऱ्यांचे संकट दूर होऊन धनधान्य पिकू दे व कोरोना महामारीत सर्वांचे आरोग्य चांगले राहू दे ही प्रार्थना सौ. कोल्हे यांनी यावेळी केली. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे व संपूर्ण कोपरगाव विधानसभा मतदारसंघ दररोज नित्य नियमाने आवडीने महंत रामगिरी महाराजांचे आध्यात्मिक विचार वर्चुअल पद्धतीतून आवर्जून ऐकत असल्याचे सौ. स्नेहलता कोल्हे यांनी सांगितले.
याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर परजणे, सोपानराव पानगव्हाणे, भास्करराव भिंगारे, फकीरराव बोरणारे, कामगार नेते मनोहर शिंदे आदी उपस्थित होते.
सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, श्रीक्षेत्र सरालाबेटाच्या विकासात भर घालण्याचे काम महंत रामगिरी महाराज यांनी केले असून त्यांची आध्यात्मिक विचारांची देवाण-घेवाण व्यापक आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीत गंगागिरी महाराजांच्यi सप्ताहातील विचार मानवाला धीर देणारे असून संकट काळात नामस्मरण भक्तीच आपल्याला तारून नेत असते. महंत रामगिरी महाराज यांनी या वैश्विक महामारी संकटाला वैद्यकीय उपचाराबरोबरच अध्यात्मिक उपचाराने कसे सामोरे जायचे याबाबतचे संपूर्ण सप्ताहभर विवेचन करून मानवाला एक मार्ग दाखवला आहे असेही त्या म्हणाल्या. शेवटी संचालक ज्ञानेश्वर परजणे यांनी आभार मानले.





