समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न
Independence Day celebrations at Samata International School
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir20 August 20:00
कोपरगाव: अहमदनगर जिल्ह्यातील विद्यार्थी केंद्रीत समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७५ वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन सौ.सुधा कैलास ठोळे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहणाने उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी स्कूल चे संस्थापक अध्यक्ष काका कोयटे हे होते.
माजी नगराध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे, फॅशन डिझायनर सौ.सिमरन खुबाणी, मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे, मुख्य कार्यवाहक संदीप कोयटे, सर्वश्री गुलाबचंद अग्रवाल, जितुभाई शहा, गुलशन होडे, भरत अजमेरे, निरव रावलिया, कचरू मोकळ, सौ.शोभा दरक उपस्थितीत होते .
सौ.सुहासिनी कोयटे यांनी सौ. सुधा ठोळे यांचा सन्मान केला. शैक्षणिक संचालिका सौ.लिसा बर्धन यांनी प्रमुख पाहुणे व प्रमुख मान्यवरांचा परिचय करून दिला. तर उपप्राचार्य समीर अत्तार यांनी स्वागत केले.
तसेच इ.७ वी तील अन्वी उंबरकर हिने १५ ऑगस्ट १९४७ रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भाषणातील विचार स्वतःच्या भाषणातून व्यक्त करत उपस्थितांची मने जिंकली तर स्कूलच्या इतर विद्यार्थांनी देशभक्तीपर गीतांवर समूह नृत्ये सादर केली. समता टायनी टॉटस मधील शौर्य शर्मा यानेही स्वातंत्र्याविषयी भाषणातून विचार व्यक्त केले. समता स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने सादर केलेली भाषणे, समूह नृत्यांनी प्रभावित होऊन प्रमुख पाहुण्या सौ.सुधा कैलास ठोळे यांनीही त्यांच्या सुरेख आवाजात ‘ये मेरे वतन के लोगो’ हे देशभक्तीपर गीत गायले आणि उपस्थितांमधील देशभक्तीची भावना जागृत करत मंत्र मुग्ध केले.
समता स्कूलचे शिक्षक रोहीत महाले व मयूर पेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली इ. १० वी तील विद्यार्थी अन्वय बारहाते व मौली काले यांनी केले.
यावेळी सौ.सुधा ठोळे, अध्यक्ष काका कोयटे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थितांना व पालकांना फेसबुक द्वारा ऑनलाइन राहून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वितेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींची विशेष परिश्रम घेतले. समता स्कूलच्या एल.के.जी. आणि यु.के.जी.तील विद्यार्थी समता स्कूलमध्ये प्रत्यक्षात उपस्थित राहिले तर हजारो विद्यार्थी आणि त्यांचे पालकांचा ऑनलाइन उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्कूलच्या सौ.शिल्पा वर्मा यांनी आभार मानले.





