आता मूळव्याधच्या आधुनिक शस्रक्रियेसाठी मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही- डॉ. तुषार गलांडे

आता मूळव्याधच्या आधुनिक शस्रक्रियेसाठी मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही- डॉ. तुषार गलांडे

No need to go to big cities for modern hemorrhoid surgery now – Dr. Tushar Galande

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir20 August 20:20

कोपरगाव : साईज्योती हॉस्पिटलमध्ये  वेसल सीलर हे अत्याधुनिक यंत्र उपलब्ध केल्यामुळे आता मूळव्याधच्या आधुनिक शस्रक्रियेसाठी मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही असा आत्मविश्वास डॉक्टर तुषार गलांडे यांनी  व्यक्त केला.वेसल सीलर हे अत्याधुनिक यंत्राचे उदघाटन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, भाजपा नेते पराग संधान, ॲड शंतनू धोर्डे, नगरसेवक मंदार पहाडे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुनील गंगुले,ऍड. विद्यासागर शिंदे, अरुण येवले,डॉ राजेश माळी, डॉ महेंद्र गोंधळी, डॉ. दादासाहेब गलांडे आदिसह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आ. आशुतोष काळे म्हणाले,   रुग्णांची गरज ओळखून डॉ. गलांडे यांनी वेसल सीलर या आधुनिक यंत्र उपलब्ध करून व्याधी रुग्णांची गैरसोय दूर केली याबद्दल त्यांचे आभार मानले. तर डॉ. तुषार गलांडे यांनी या आधुनिक यंत्रची माहिती देताना सांगितले की या यंत्रमुळे रुग्णाला    ॲडमिट राहण्याची गरज नसते, जखम खोल न होता टाके टाकण्याची गरज नाही, शौचाचे नियंत्रण जाण्याचा धोका नसतो, शस्रकीयेनंतर जंतू संसर्ग होण्याचा धोका कमी, तसेच शस्रक्रियेनंतर लवकरात लवकर दैनंदिन कामकाजस सुरवात करता येते ही या यंत्रद्वारे करण्यात येणाऱ्या शस्रक्रियेचे फायदे असल्याचे डॉ. गलांडे यांनी सांगितले.

या उदघाटन प्रसंगी ग्रामीण रुग्णालय चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर डॉ. सतीश अजमेरे, डॉ. आतिष काळे,डॉ. महेश जाधव, डॉ. अप्पासाहेब आदिक,डॉ. योगेश बनकर, डॉ. बंडू शिंदे,डॉ. संजय उंबरकर, डॉ. सतीश लोढा, डॉ. नितीन झंवर,डॉ सचिन उंडे,डॉ सौ शीतल उंडे,डॉ. सौ उंबरकर ,डॉ. गिरीश क्षत्रिय,डॉ. संदीप मुरूमकर, डॉ. रमेश सोनवणे, डॉ. निलेश गायकवाड,डॉ. प्रफुल्ल कुडके,डॉ. सौ मंजुषा गायकवाड,डॉ. राजेंद्र वाघडकर ,डॉ. अमोल अजमेरे आदिसह उपस्थित होते. मान्यवारांचे स्वागत डॉ. दादासाहेब गलांडे सौ. ज्योती गलांडे डॉ. काजल गलांडे यांनी केले तर आभार डॉ. तुषार गलांडे यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page