कोपरगावात नारायण राणेचा निषेध, गुन्हा दाखल करण्याची मागणी 

कोपरगावात नारायण राणेचा निषेध, गुन्हा दाखल करण्याची मागणी 

Narayan Rane’s protest in Kopargaon, demand to file a case

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lTue24 August 16:30

कोपरगाव : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा कोपरगावात निषेध करण्यात आला. राणें यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

दरम्यान, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे , शहरप्रमुख, कलविंदर दडियाल यांनी शहर  पोलीस ठाण्यात नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात यावी या मागणीचे निवेदन सपोनि   भरत नागरे यांना दिले  आहे.
यावेळी महिला  आघाडीच्या सपना मोरे, विमल पुंडे, असलम शेख,  इरफान शेख, राहुल देशपांडे, भूषण पाटणकर  यांच्यासह शिवसैनिक  सहभागी झाले होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page