काम करायचे नसेल तर बदली करून घ्या; आ. आशुतोष काळेंनी वीज अधिकाऱ्यांना फटकारले
If you don’t want to work, replace; Come on. Ashutosh Kale slapped the power officials
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed25 August 17:00
कोपरगाव : विजेच्या बाबत अनेक नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या असंख्य तक्रारी येत असून आपल्या कामात सुधारणा न झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असा निर्वाणीचा ईशारा देऊन काम करायचे नसेल तर बदली करून घ्या; आ. आशुतोष काळेंनी वीज अधिकाऱ्यांना सर्वांसमक्ष फटकारले,अधिका-यांना झापल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे.
कोपरगाव शहर व मतदारसंघात नागरिकांना विजेच्या बाबतीत अनंत अडचणी येत आहेत. कमी दाबाने होणारा वीजपुरवठा, वारंवार जाणारी वीज व अनेक ठिकाणी दुरुस्तीची कामे रखडली आहेत. यावरून महावितरणच्या अधिकाऱ्यांना वीजप्रश्नी गौतम बँक सभागृहातील आढावा बैठकीत सुनावले.
रोहित्र उभारणीचे काम घेतलेले ठेकेदार वेळेत काम पूर्ण करीत नसल्यामुळे अडचणींमध्ये भर पडत आहे. अशा ठेकेदारांवर महावितरण कारवाई का करीत नाही? असा सवाल करून या ठेकेदारांना अभय न देता हे ठेकेदार काळ्या यादीत टाका असा संताप आ. काळे यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर सोबत असलेल्या अधिकऱ्यांना त्यांनी फैलावर घेतलं. .
शेतकरी व नागरिकांना येत असलेल्या विजेच्या समस्या लवकरात लवकर सोडवा. दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करून नवीन मंजूर झालेले रोहित्र लवकरात लवकर बसवा यापुढे नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाही याची काळजी घ्या अन्यथा त्याचे गंभीर परिणाम संबंधित अधिकाऱ्याला भोगावे लागतील असा दम भरला असल्याचे यावेळी पाहायला मिळाले आहे.
यावेळी महावितरणचे प्रभारी कार्यकारी अभियंता शैलेश मुळे, राहाता विभागाचे उपकार्यकारी अभियंता डी. डी. पाटील, अभियंता शिरीष वाणी, अति. कार्यकारी अभियंता भगवंत खराटे, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, राष्ट्रवादीचे राहाता शहराध्यक्ष नंदकुमार सदाफळ आदी उपस्थित होते.





