आयुक्त कल्पिता पिंपळें यांच्यावरील हल्ल्याचा निषेधार्थ ; कोपरगाव पालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

आयुक्त कल्पिता पिंपळें यांच्यावरील हल्ल्याचा निषेधार्थ ; कोपरगाव पालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

Protest against the attack on Commissioner Kalpita Pimple; Kopargaon Municipal Corporation employees strike

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue 31 August 20:20

कोपरगाव :ठाण्याच्या अतिरिक्त पालिका आयुक्त कल्पिता पिंपळे मंचावर यांच्यावर झालेला हल्ला ही घटना अतिशय निंदनीय असून अधिकाऱ्यावर हल्ला करण्याची कृती अजिबात खपवून घेतली जाणार नाही, झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी कोपरगाव नगरपरिषद अधिकारी कर्मचारी एक दिवसीय काम बंद आंदोलन केले .

ठाणे महापालिकेतील माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत येत असलेल्या कासारवडवली नाक्यावरील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी कल्पिता पिंपळे गेल्या होत्या. या कारवाईच्या दरम्यान अमरजित यादव या फेरीवाल्याकडून त्यांच्यावर कोयत्याने अचानक हल्ला करण्यात आला.त्यांनी हात वर केल्याने त्यांची दोन बोटेच तुटून पडली, तर बचावासाठी धावलेल्या अंगरक्षकाचेही एक बोट तुटले आहे. त्यांच्यावरील उपचारांची सर्व जबाबदारी ठाणे महानगरपालिकेने घेतली असून त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली. ही घटना अतिशय निंदनीय असून हल्ल्याचा निषेध म्हणून काल मंगळवारी ( ३१) रोजी कोपरगाव नगरपरिषद अधिकारी कर्मचारी एक दिवसीय काम बंद आंदोलन केले .

Leave a Reply

You cannot copy content of this page