प्रामाणिक शिलेदारांच्या मोलाची उंची वाढवू -विवेक कोल्हे.
To increase the value of honest stonemasons – Vivek Kolhe.
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed 1sep 2021,18:00Pm.
कोपरगाव :संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनातून युवकांचे संघटन वाढवून त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी संजिवनी युवा प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली.संजीवनी युवा प्रतिष्ठानने सामाजिक कार्याबरोबरच सर्व जाती-धर्माच्या सण-महोत्सवांना विशिष्ट उंचीवर नेत त्यातून जाणीवतेच्या भावनेची शिकवण दिली. या कार्यात आम्हांस साथ देणारे प्रामाणिक शिलेदारांचे महत्त्व तेव्हढेच मोलाचे असून, आगामी काळात त्यांचीही उंची वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू असे प्रतिपादन संजिवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी कोपरगाव शहर व तालुका भाजपाच्या व संजिवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने गोपाळकाला दहीहंडी महोत्सव कोरोना नियम पाळून साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी चिमुकली वैष्णवी अहिरे, युवराज दौलतराव लटके, भाग्यश्री ज्ञानेश्वर सोनवणे या गरजू गरीब रुग्णांना प्रत्येकी अकरा हजार रुपयांच्या मदतीचे वितरण विवेक कोल्हे, ह भ प लोहाटे महाराज, सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास जाधव, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, राजेंद्र सोनवणे, दिलीप दारुनकर, विजय वाजे, विजय आढाव, अमृत संजीवनीचे अध्यक्ष बाळासाहेब उर्फ पराग संधान, विनोद राक्षे यांच्या हस्ते करण्यात आले, तर प्रारंभी भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्यारा ऑलिंपिक क्रीडास्पर्धेत दहा भारतीयांना विविध पदके मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन ठराव यावेळी मांडण्यात आला. याप्रसंगी सर्वश्री नारायण अग्रवाल, गोपी गायकवाड, पिंकी चोपडा, सिध्दार्थ साठे, रोहित कनगरे, वासू शिंदे, सागर राऊत, गौरव येवले, अशोक लकारे, फकीर महंमद पहिलवान, आदी उपस्थित होते.
विवेक कोल्हे म्हणाले, कोपरगाव विधानसभा मतदारसंघावर आलेल्या प्रत्येक संकटात सर्वप्रथम संजिवनी उद्योग समूह धावून येतो. आपण सगळेजण संस्कृती परंपरेने सण साजरे करतो. पण गेल्या दोन वर्षांमध्ये आपल्या सगळ्यांनीच कोरोणा महामारीत कूणी न कूणी जवळच्या आप्तजनांना गमावलेल आहे. प्रत्येक धार्मिक सणासुदीत युवा पिढीला आई-वडिलांचे महत्त्व जास्त आहे. कोरोना लॉकडाऊन काळात जगात अनेक वाद निर्माण झाले, अनेक कुटुंब विभक्त झाली.
संजीवनी युवा प्रतिष्ठानने विविध सामाजिक उपक्रम, आरोग्य शिबिर, कृषी निगडित काही कार्यक्रम, पर्यावरण संवर्धन, नेत्र तपासणी शिबिरा बरोबरच विविध महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्या. सिद्धार्थ साठे यांनी आभार मानले.