गौतम बँकेस राष्ट्रीय पातळीवरील “बँको ब्लू रिबन पुरस्कार” प्रदान     

गौतम बँकेस राष्ट्रीय पातळीवरील “बँको ब्लू रिबन पुरस्कार” प्रदान

   Gautam Bank awarded the national level “Banco Blue Ribbon Award”

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed 1sep 2021,18:02

कोपरगाव :सहकारातील अग्रगण्य गौतम सहकारी बँकेच्या शिरपेचात मानाचा तुरा, देश पातळीवरील “उत्कृष्ट टेक्नॉलॉजी पुरस्कार” नुकताच कर्नाटक राज्यातील म्हैसूर येथे म्हैसूरचे विद्यमान खासदार प्रताप सिम्हा यांच्या हस्ते आ. आशुतोष काळे यांनी स्वीकारला आहे.

उत्कृष्ट टेक्नॉलॉजी पुरस्कारासाठी देशभरातील अनेक नागरी बँकांची आर्थिक निकषावर पाहणी करण्यात आली होती. यामध्ये ग्रामीण भागातील बँकेची आर्थिक परिस्थिती, आधुनिक डिजिटल बँकींग माहिती व तत्रंज्ञान, बँकेच्या ठेवी, वसुलीची पध्दती, तसेच सभासद, कर्जदार यांचे हिताचे संरक्षण आदी बाबींचे “बँको”च्यावतीने परीक्षण करण्यात आले होते. यामध्ये गौतम सहकारी बँक सर्व निकषांवर सरस ठरत उत्तम कारभार करत असल्यामुळे या पुरस्कारासाठी बँकेची निवड यापूर्वीच जाहीर करण्यात आली होती. मात्र कोवीड १९ मुळे सदर पुरस्कार प्रदान कार्यक्रम झालेला नव्हता. हा कार्यक्रम बुधवार (दि.०१) रोजी म्हैसूर येथे संपन्न झाला असून गौतम बँकेस स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. आमदार आशुतोष काळे यांनी बँकेच्या वतीने या पुरस्काराचा स्विकार केला. याप्रसंगी बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, व्हा.चेअरमन धोंडीराम वक्ते,संचालक, अनिल महाले, नानासाहेब रोहम, अँड सुनिल शिलेदार, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बापूसाहेब घेमूड, संगणक इनचार्ज उमेश ढगे हजर होते.               

आजरोजी बँकेच्या ठेवी १०० कोटीच्या पुढे गेल्या आहेत. रिझर्व बँकेच्या सर्वच नियमांचे काटेकोरपणे पालन करून स्वच्छ व पारदर्शक कारभारामुळे बँकेला मिळत असलेले पुरस्कार अभिनंदनिय असल्याचे बँकेचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांनी म्हटले असून त्यांनी बँकेचे चेअरमन, व्हा.चेअरमन, सर्व संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.        

Leave a Reply

You cannot copy content of this page