कोपरगावात मुसळधार पाऊस; गोदावरीला अडीच हजार कुसेक्स पाणी सोडले

कोपरगावात मुसळधार पाऊस; गोदावरीला अडीच हजार कुसेक्स पाणी सोडले कोपरगाव शहर व परिसरात आज सायंकाळी अर्धातास मुसळधार पाऊस झाला दरम्यान सायंकाळी सहा वाजता नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून पंचवीस शे क्युसेक्स पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले अशी माहिती पाट बंधारे खात्याच्या वतीने देण्यात आली तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडला तर ब्राह्मणगाव येथे रात्री अडीच वाजता तुरळक हरभऱ्याच्या आकारांचा गारांचा पाऊस पडल्याचे वृत्त आहे आज दिवसभर मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत होता चटका ही चांगलाच बसत होता अंगातून घामाच्या धारा ही वाहत होत्या, पेरणी केलेले बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकटाला सामोरे जावे लागत आहे जातो आठ-दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होता परंतु गेल्या दोन दिवसापासून हवामान बदलल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या काल रात्रीपासून ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे पावसाला जोर नसला तरी पडणारा पाऊस हा उपयुक्त ठरणारा आहे ज्यांची पेर उतरली आहे त्यांच्या पिकांना या पावसामुळे जोर मिळणार आहे तर दुबार पेरणी करणार्‍यांना सुद्धा पेरणी करण्यास उपयुक्त ठरणार आहे थोडक्यात हा पाऊस आता शेतीला पूरक आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे शहरात मुसळधार पाऊस झाल्याने रस्ते गटारी स्वच्छ धुऊन गेल्या अनेक प्रभागात सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते दिवसभर ढगाळ हवामान होते तालुक्याच्या इतर भागात कमी आलात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाल्याचे कळते

Leave a Reply

You cannot copy content of this page