कोपरगाव :
आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे पेरणी करून शेतात न उगवलेल्या बियाणांच्या बदल्यात महाबीज व ग्रीन गोल्ड या कंपन्यांनी नवे बियाणे देण्याचे मान्य केले, पण त्याचबरोबर शेतकर्यांना अतिरिक्त भरपाई द्यावी, यासाठी आपण कंपन्याकडे प्रयत्नरत असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या तक्रारी नंतर आपण कृषी अधिकार्यांसमवेत प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली असता बियाणे उगवले नसल्याचे दिसून आले असेही त्यांनी सांगितले पेरणी मोसमाच्या आत शेतकऱ्यांना नवीन बियाणे मिळावे यासाठी शासनाकडे व महाबीजकडे त्याबाबत पाठपुरावा केला होता. शासनाच्या आदेशानुसार महाबीज कंपनी चे नवीन बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत
त्यासाठी ज्यांची पेरणी केलेले बियाणे उगवले नाहीत कृषी दुकानातून खरेदी केलेली बियाणे निकृष्ट दर्जाची निघाली आहेत. अशा शेतकऱ्यांना तक्रार निवारण समिती अहवालानुसार मिळणार आहे पण यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे खरेदी बिल,आधार कार्ड, बियाण्याच्या पिशवीला असलेल्या लेबलची झेरॉक्स घेऊन जावे त्यांना बियाणे त्या त्या दुकानातून उपलब्ध होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पंचायत समितीच्या कृषी विभागाशी व महाबीज कंपनीच्या अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क करावा असे आवाहन आ. काळे यांनी केला आहे